सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, हवामानासाठी रडार, पर्यटनासाठी ‘रोप-वे’, रेल्वे देखभाल दुरुस्ती केंद्र, शहरात ‘ ग्लो- गार्डन’ अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून औरंगाबादच्या विकासच्या घोषणा केल्यानंतर अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आता औरंगाबाद शहरातील शेंद्रा- वाळुंज या दोन औद्योगिक वसाहती जोडणारा उड्डाण पूल व त्यावर ‘निओ -मेट्रो’ आणण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांच्या घोषणांचा वेग ‘ लोकसभा’ निवडणुकीच्या तयारीचा भाग असल्याचे मानले जात आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून

हेही वाचा… पुण्यात दोन दादांची वर्चस्वाची लढाई सुरू; अजितदादा आणि चंद्रकांतदादा आमने-सामने

सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार केल्यानंतर महिनाभरात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना निवडणूक तयारीचाच भाग असल्याचे मानले जात आहे. ही खूप मोठी स्वप्न आहेत, असा आक्षेप एमआयएमचे आमदार खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला. पण स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची ताकदही आमच्यामध्ये आहे, असे उत्तर देत डॉ. कराड यांनी खासदार जलील यांना गप्प केले.

हेही वाचा… पंकज गोरे – रांगड्या शिवसेनेत उच्चविद्याविभूषित आणि कार्यमग्न कार्यकर्ता

औरंगाबाद शहरातील विविध विकास कामांच्या आढावा बैठका सुरू असतानाच भाजपच्या वतीने प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र रचना लावली जात आहे. एका बाजूला लाभार्थी मतदार करण्याची प्रक्रिया, दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीने आणले जाणारे प्रकल्प या आधारे जनमत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न डॉ. कराड करत असल्याचे चित्र औरंगाबाद जिल्ह्यात आहे. शहरातील दळणवळण हे विकासाचे इंजिन बनताना तेच मतदारापर्यंत मनात सहानुभूती निर्माण करणारे साधन बनावे असे प्रयत्न आवर्जून केले जात आहेत. औरंगाबाद शहरातील दोन औद्योगिक वसाहती जोडण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सध्या शहरातील काही उड्डाणपूल काढून टाकावे लागणार असून नवा एकच उड्डाणपूल व त्यावर निओ- मेट्रो’ अशी मिश्र दळणवळण व्यवस्था निर्माण केली जात आहे. यासाठी साधारण सहा हजार २७८ कोटी रुपये लागू शकतात, असा अंदाज अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही सर्व रक्कम केंद्र व राज्य सरकारमार्फत उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. कराड यांनी पत्रकारांना सांगितले.