लोकसभा निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. अशातच राजस्थानमध्ये भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून वसुंधरा राजे या पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना गैरहजर होत्या. त्यामुळे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या नाराज असल्याची चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी वसुंधरा राजे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बिहार : सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यामागे भाजपाची रणनीती काय? वाचा…

मागील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले. त्यामुळे सहा वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. मात्र, भाजपाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले, तेव्हापासून वसुंधरा राजे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वसुंधरा राजे यांनी मागील काही दिवसांत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमांनाही दांडी मारली. यामध्ये ३० डिसेंबर रोजी झालेल्या भजनलाल शर्मा यांचा शपथ विधी, पंतप्रधान मोदी यांचा जयपूर दौरा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपाने आयोजित केलेल्या बैठकीचा समावेश होता. मात्र, ज्यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन जयपूरला पोहोचले, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्या विमानतळावर उपस्थित होत्या.

त्यामुळे भजनलाल शर्मा आणि वसुंधरा राजे यांच्या भेटीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न म्हणून बघितले जात आहे. यासंदर्भात बोलताना भाजपाचे वरिष्ठ नेते ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले, “वसुंधरा राजे या भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्या दोन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचा प्रभाव हा केवळ हाडोटी प्रदेशापर्यंतच मर्यादित नाही, तर संपूर्ण राजस्थानमध्ये आहे.”

हेही वाचा – …जेव्हा जयललिता यांनी दागिने न घालण्याचा केला होता संकल्प; जे. जयललिता यांच्या दगिन्यांचा २५ वर्षांचा इतिहास

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपाने राजस्थानमधील सर्वच २५ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आगामी २०२४ च्या निवडणुकीतही राजस्थानमधील सर्वच जागांवर विजय मिळवून राजस्थानमध्ये विजयची हॅट्ट्रिक करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. याशिवाय भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वच २५ जागांवर विजय मिळवणे भाजपासाठी आवश्यक आहे.

या सगळ्यात भाजपासाठी दिलासादायक बाब म्हणजे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन जयपूरला पोहोचले, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्या विमानतळावर उपस्थित होत्या. याशिवाय त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यानही स्थानिक राम मंदिरात पूजा केली. त्यामुळे