आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे काँग्रेसने ओडिसा राज्याकडे विशेष लक्ष दिले आहे. येथे पक्ष बळकट करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. नुकतेच येथे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रबोध यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला ओडिसामध्ये बळ मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिर्की ओडिसा येथील तालसारा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे.

१८ वर्षे केली नोकरी आता राजीनामा

प्रबोध तिर्की यांनी साधारण १८ वर्षे एअर इंडियामध्ये नोकरी केली. या वर्षाच्या जुलै महिन्यात त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. आता त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ते हॉकी या क्रीडा प्रकारातील मोठे नाव आहे. याआधी दिलीप तिर्की यांनीदेखील गेल्या वर्षी भाजपा पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.

delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!
Kashmir youth employment, Pune organisation,
काश्मीर खोऱ्यातील तरुणही आता रोजगाराभिमुख, पुण्यातील संस्थांचा लष्काराच्या मदतीने पुढाकार
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
tejas Thackeray
माजी मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव चक्क सामान्‍यांच्‍या खुर्चीत! वलगावातील सभेत…
Uran Assembly, Shekap, Pritam Mhatre,
शेकाप नेत्यांच्या आदेशानेच निवडणूक रिंगणात, उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

राहुल गांधी यांची विचारधारा, काम आवडले – प्रबोध

प्रबोध तिर्की यांनी पक्षप्रवेशावेळी मी राहुल गांधी यांच्या कामामुळे प्रभावित झालो, अशी प्रतिक्रिया दिली. “मी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची विचारधारा आणि काम यामुळे खूप प्रभावित झालो आहे. भारत जोडो यात्रेने मला भुरळ घातली. मला काँग्रेसकडून राजकारणात येण्याचा प्रस्ताव आला होता, तो मी स्वीकारला आहे,” अशी प्रतिक्रिया तिर्की यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. प्रबोध तिर्की यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी ओडिसा राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सरत पटनाईक, ओडिसाचे प्रभारी छेल्ला कुमार तसेच अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी प्रबोध तिर्की ओडिसा सरकारवर टीका केली. तालसारातील नागरिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. येथील आदिवासी समाजाला सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळालेला नाही, असे ते म्हणाले.

प्रबोध यांचे बंधूही हॉकी संघाचे माजी कर्णधार

प्रबोध तिर्की हे बालीशंकारा ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या लुलकिडीही गावाचे रहिवासी आहेत. ते भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार इग्नास तिर्की यांचे धाकटे बंधू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्ष आदिवासीबहुल सुंदरगड जिल्ह्यात आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्रबोध यांच्या येण्याने काँग्रेसला येथे विस्ताराची चांगली संधी निर्माण झाली आहे.

काँग्रेसला हवा होता प्रभावी चेहरा

तीन वेळा आमदार राहिलेले प्रफुल्ल माझी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये बीजेडी पक्षात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला तालसारा येथे प्रभावी चेहऱ्याचा शोध होता. प्रबोध यांच्या रुपात हा चेहरा त्यांना मिळाला आहे. माझी यांनी २०१९ साली तालसारा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथून त्यांचा पराभव झाला होता. भाजपाचे भाबानी शंकर भोई यांनी माझी यांचा पराभव केला होता.

प्रबोध यांच्या नेतृत्वाखाली भारताला सुवर्ण पदक

प्रबोध यांनी भारतासाठी एकूण १३५ सामने खेळलेले आहेत. ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधारही राहिलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारताने २००७ साली आशिया चषकात सुवर्ण पदक पटकावले होते.