अमरावती : भाजपच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी यासंदर्भात सुतोवाच केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी पराभूत केले होते. बळवंत वानखडे हे दर्यापूरचे आमदार होते. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी अचानकपणे दर्यापूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून सभांचे आयोजन केल्याने त्या दर्यापूरमधून विधानसभेची निवडणूक लढणार का, अशी चर्चा रंगली होती. पण, त्याविषयी बोलताना रवी राणा यांनी ही शक्यता फेटाळून लावली.
हेही वाचा – दक्षिण नागपूर सोडण्यास काँग्रेस तयार नाही, तातडीची बैठक ऐनवेळी रद्द झाल्याने तर्कवितर्क
नवनीत राणा या विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपमधील इतर वरिष्ठ नेत्यांनी नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, असे यापूर्वीच सांगितले आहे. त्यांच्यासाठी राज्यसभा ही जनसेवेची मोठी संधी आहे. विधानसभा निवडणुकीत त्या संपूर्ण राज्यभर भाजपचा प्रचार करतील, असे रवी राणा यांनी सांगितले.
नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी १० कोटींची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र हैदराबाद येथून पाठविण्यात आले होते. गेल्या मार्च महिन्यात देखील व्हॉट्सअॅपवर एक ध्वनिफित पाठवून नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हैदराबाद येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. नवनीत राणा यांना केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता त्यांची पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
हेही वाचा – निवडणूक काळात चक्राकार गतीने फिरणारे जोरगेवार!
लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला, तरी नवनीत राणा यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर जनाधार वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमरावती मतदारसंघात मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या. महिलांना साड्या आणि भेटवस्तू दिल्या. त्यामुळे त्यातून राजकीय अर्थ काढले गेले. पण, आता नवनीत राणा या राज्यसभेवर जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे हे राज्यसभा सदस्य आहेत. नवनीत राणा यांना संधी मिळाल्यास जिल्ह्यातील दोन नेते राज्यसभेवर प्रतिनिधित्व करतील.
भाजपच्या पक्षनेतृत्वाला नवनीत राणा यांच्या कार्याबद्दलची एवढी आवश्यकता वाटत असेल, यासंदर्भात नेतृत्वाला ‘फीडबॅक’ मिळाला असेल, तर ते याविषयी निर्णय घेतील. नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हालचालींविषयी प्रदेश किंवा जिल्हा स्तरावर माहिती प्राप्त झालेली नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात, तो भाजपचे कार्यकर्ते मान्य करतात. – शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ते, भाजप.