सतीश कामत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी आमदार सदानंद चव्हाण अखेर शिवबंधन तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले आहेत. आपल्या समर्थकांसह त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. उद्योग मंत्री उदय सामंत हेही या वेळी उपस्थित होते.

या प्रवेशाबाबत चव्हाण यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आगामी काळात चिपळूण मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघासाठी ते निधी देणार असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मी त्यांच्याशी बोललो आहे. पुढील दोन वर्षांत चिपळूणसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा… एकनाथ शिंदे यांची पुण्यातील गणेशोत्सव संपर्क मोहीम फलदायी होईल का ?

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कदम म्हणाले की, चव्हाण दहा वर्षे आमदार होते. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असे काहीही घडले नाही. त्यामुळे ते शिंदे गटात का गेले, समजत नाही. पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

हेही वाचा… काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांचा पाहुणचार साध्या ‘राइस प्लेट’वर!

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा निवडून आलेले चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी अस्वस्थता व्यक्त केली होती. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी २००४ मध्ये पक्ष सोडल्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली, असा दावा ते वारंवार करत होते. पण मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चव्हाण सक्रिय राजकारणापासून दूर होते. गुरुवारी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या भेटीच्या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, उपतालुकाप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे, अनंत पवार, युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख संदेश आयरे, विभाग प्रमुख बळीराम चव्हाण इत्यादी निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former shiv sena mla sadanand chavan joined eknath shinde group print politics news asj