इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने मंगळवारी दिल्लीतील लोकसभेच्या चारही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. उमेदवारांची घोषणा करताना आपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसबरोबर झालेल्या करारात आम्हाला चार जागा मिळाल्या आहेत, ज्यामध्ये नवी दिल्लीतून सोमनाथ भारती, पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, दक्षिण दिल्लीतून साहिरम आणि कुलदीप कुमार यांना उमेदवारी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर समन्वय साधण्यासाठी आम आदमी पक्षानेही समन्वय समितीचा प्रस्ताव ठेवला आहे.

नवी दिल्लीचे उमेदवार सोमनाथ भारती

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती सलग तिसऱ्यांदा मालवीय नगर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते दिल्ली सरकारचे माजी कायदा, प्रशासकीय सुधारणा, कला आणि सांस्कृतिक मंत्री राहिले आहेत. सध्या ते दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय सोमनाथ भारती तामिळनाडू, पाँडेचेरी, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये “आप” चे प्रभारी आहेत. ते आयआयटी दिल्ली माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सिनेटचे माजी सदस्यही राहिले आहेत. सोमनाथ भारती यांनी १९९७ मध्ये आयआयटी दिल्लीतून एमएससी पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. यानंतर २०१० मध्ये सोमनाथ भारती यांनी दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि तेव्हापासून ते त्यांच्याशी जोडले गेले. २६ नोव्हेंबर २०१२ रोजी आम आदमी पार्टीची स्थापना झाली, तेव्हा सोमनाथ भारती हे त्यांचे संस्थापक सदस्य झालेत. २०१३ मध्ये मालवीय नगरमधून आप आमदार म्हणून निवडून आल्यावर ते कायदा मंत्री झाले आणि त्यांनी न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंगसह १९ प्रमुख सुधारणा केल्या. २०१५ आणि २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिसऱ्यांदा मालवीय नगर जिंकले. लोकांशी संपर्क साधण्यासाठी ते त्यांच्या मतदारसंघात रोज कोणाच्या तरी घरी जेवतात. आयआयटी दिल्ली माजी विद्यार्थी संघटनेने विविध क्षेत्रात राष्ट्राच्या विकासात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना OCND पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Solapur, Uddhav Thackeray group leader, benami assets,
सोलापूर : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडे ११.१२ कोटींची बेनामी मालमत्ता, बार्शीत गुन्हा दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra fadnavis ajit pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस – अजित पवार आमने सामने! ‘बटेंगे तो कटेंगे’वरून महायुतीत जुंपली? म्हणाले, “राष्ट्रवादी मिजाज…”
Devendra Fadnavis, Sandeep Naik, Khairane MIDC office,
फडणवीस यांचे संदीप नाईकांना आव्हान, खैरणे एमआयडीसी कार्यालयात पत्रकार परिषद
former ministers who rebel and won
अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात

पूर्व दिल्लीचे उमेदवार कुलदीप कुमार

कुलदीप कुमार अगदी सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्याचे वडील दिल्ली महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पूर्व दिल्लीत आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व केले आणि दलित तरुणांना शिक्षणाबाबत जागृतीसाठी एकत्र केले. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्याम लाल महाविद्यालयातून इतिहास ऑनर्सचे शिक्षण घेतले. यानंतर ते इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि अण्णा आंदोलनात सक्रिय झाले. ते पूर्व दिल्लीतील आम आदमी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते. वयाच्या २७ व्या वर्षी २०१७ मध्ये कल्याणपुरी वॉर्डमधून ते ‘सर्वात तरुण’ नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते म्हणून नामनिर्देशित होणारे सर्वात तरुण नेते बनले. कुलदीप कुमार यांच्याकडे आम आदमी पार्टीची प्रमुख खाती आहेत. त्यांना आम आदमी पार्टीच्या अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती विंगचे अध्यक्ष करण्यात आले. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि विविध वृत्तवाहिन्या आणि टीव्ही वादविवादांमध्ये पक्ष आणि सरकारच्या प्रयत्नांचे प्रतिनिधित्व करतात. तीन वर्षांच्या आत २०२० च्या दिल्ली निवडणुकीत ते कोंडली विधानसभेतून विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवडून आले. ते दिल्ली विधानसभेतील सर्वात तरुण आमदारांपैकी एक आहेत. पूर्व दिल्ली जमनपार, लाल बहादूर शास्त्री हॉस्पिटल खिचडीपूर आणि गुरुतेग बहादूर हॉस्पिटल दिलशाद गार्डन या दोन मोठ्या हॉस्पिटल्सच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. “मोनू भैय्या” या नावाने प्रसिद्ध असलेला कुलदीप कुमार हा आपल्या लोकांमध्ये युथ आयकॉन आहे.

हेही वाचाः राज्यसभा निवडणूक २०२४ : कर्नाटकमध्ये भाजपाच्या दोन आमदारांच्या मदतीमुळे काँग्रेसचा विजय? क्रॉस व्होटिंग करणारे आमदार आहेत तरी कोण?

पश्चिम दिल्लीचे उमेदवार महाबल मिश्रा

महाबल मिश्रा हे मूळचे बिहारमधील मधुबनी येथील सिरियापूर येथील रहिवासी आहेत. ते अनेक वर्षांपासून दिल्लीतील पूर्वांचल समाजाचा प्रमुख चेहरा आहेत. भारतीय लष्करातून निवृत्तीनंतर त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. त्यांचा जन्म ३१ जुलै १९५३ रोजी झाला होता आणि ते पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलांसह दिल्लीत राहतात. त्यांनी ट्रान्झिस्टर थिअरीमध्ये डिप्लोमा केला आहे. १९८२ मध्ये सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात व्यस्त झाले. १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. महाबल मिश्रा हे १९९७ ते २००८ पर्यंत दिल्ली विकास प्राधिकरणाचे (DDA) सदस्य होते. १९९८ मध्ये ते दिल्लीच्या नसीरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००३ आणि २००८ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते सलग दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा नसीरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले. २००९ पर्यंत ते दिल्ली विधानसभेचे सदस्य होते. यानंतर २००९ मध्ये १५व्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. या कालावधीत ते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती, गृह प्रकरणावरील सल्लागार समिती आणि वीज प्रकरणावरील सल्लागार समितीचे सदस्य होते. आम आदमी पार्टीचे द्वारका विधानसभेचे सध्याचे आमदार विनय कुमार मिश्रा यांचेही ते वडील आहेत. महाबल मिश्रा हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत.

हेही वाचाः पसमांदा मुस्लीम संघटनेच्या अहवालात भाजपावर टीका; समुदायाला खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याची मागणी

दक्षिण दिल्लीचे उमेदवार साहिराम पहेलवान

सहिराम पहेलवान यांचा जन्म दक्षिण दिल्लीतील तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघातील तनखंड गावात झाला. त्यांचे वडील सामाजिक कार्यकर्ते होते. साहिरम हे कुस्तीपटू आहेत, त्यामुळे त्यांच्या नावात “कुस्तीगीर” हा शब्ददेखील जोडला गेला. त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्येही काम केले आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी CISF चा राजीनामा दिला. सहिराम पहेलवान यांची राजकीय कारकीर्द १९९७ मध्ये सुरू झाली, जेव्हा ते पहिल्यांदा MCD मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९९ ते २००२ पर्यंत ते दिल्ली महानगरपालिकेचे (मध्य क्षेत्र) अध्यक्ष होते. २००७ आणि २०१३ मध्ये सहिराम पहेलवान सलग दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा नगरपरिषदेत निवडून आले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी एमसीडीचे उपमहापौरपद भूषवले. २०१५ मध्ये सहिराम पहेलवान हे त्यांच्या जन्मस्थान तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. २०२० मध्ये ते त्याच जागेवरून दुसऱ्यांदा दिल्ली विधानसभेचे सदस्य झाले. या वर्षी २०२४मध्ये साहिरम पहेलवान हे दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत.