उत्तर प्रदेशात मंगळवारी चार मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी राजभवनात तीन आमदार आणि एका विधान परिषदेच्या सदस्यांना शपथ दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार २.० चा हा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आहे. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, भाजपा आमदार दारा सिंह चौहान, भाजपा आमदार सुनील शर्मा आणि आरएलडीचे आमदार अनिल कुमार यांनी राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांमध्ये दारा सिंह चौहान हे सर्वात श्रीमंत तर सुनील कुमार शर्मा हे सर्वात सुशिक्षित मंत्री आहेत.

ओमप्रकाश राजभर दुसऱ्यांदा मंत्री झाले

ओमप्रकाश राजभर हे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ओमप्रकाश राजभर हे मागास जातीतील आहेत. सध्या राजभर हे गाझीपूर जिल्ह्यातील जहूराबाद मतदारसंघातून सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे आमदार आहेत. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून राजभर पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर ते मार्च २०१७ ते २०१९ पर्यंत योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात मागासवर्गीय कल्याण आणि अपंग कल्याण, सार्वजनिक विकास मंत्री होते. नंतर त्यांनी भाजपासोबतची युती तोडली. राजभर यांनी समाजवादी पक्षाबरोबर २०२२ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून राजभर दुसऱ्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत पोहोचले. ६१ वर्षीय ओमप्रकाश राजभर यांच्याकडे २.६१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. माजी मंत्री आणि आमदार म्हणून मिळालेले कृषी आणि पगार भत्ते हे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. राजभर यांनी २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली होती. त्यांनी १९८३ मध्ये बलदेव पदवी महाविद्यालय बारागाव (वाराणसी) येथून पदवी प्राप्त केली.

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
arvind kejriwal latest news (1)
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान?
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Tejashwi Yadav on Nitish Kumar
Tejashwi Yadav on Nitish Kumar: ‘नितीश कुमार आमच्याकडे हात जोडत आले’, तेजस्वी यादव यांचा आरोप; म्हणाले, “पुन्हा चूक…”
Devendra Fadnavis on CM face
Devendra Fadnavis on CM face: “शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाचं नाव शिजतंय”, देवेंद्र फडणवींसाचं मोठं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना..”
Shinde group, NCP Ajit Pawar party,
लाडकी बहीण योजनेतून राष्ट्रवादीने ‘ मुख्यमंत्री ’ शब्द वगळल्याबद्दल शिंदे गटाचा आक्षेप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद
Ajit Pawar, RSS Memorial, Ajit Pawar Avoids RSS Founder s Memorial, Hedgewar Smruti Mandir BJP, Nagpur, Deekshabhoomi,
अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?

हेही वाचाः मध्य प्रदेश भाजपात मोठे फेरबदल, काय आहे भाजपाचा मास्टरप्लॅन?

दारा सिंह चौहान २०२२ मध्ये सपाच्या तिकिटावर विजयी झाले होते

दारा सिंह चौहान हे भाजपाचे विधान परिषद (MLC) सदस्य आहेत. दारा सिंह चौहान मागासलेल्या जातीतले आहेत. ते मऊ जिल्ह्यातील घोसी मतदारसंघातून आमदार आहेत. दारा सिंह चौहान २०२२ मध्ये सपाच्या तिकिटावर या जागेवरून विजयी झाले होते. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळी चौहान विजयी झाले नाहीत. सपाचे सुधाकर सिंह यांनी त्यांचा पराभव केला. दारा सिंह हे साडेचार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. भाजपा नेत्याने शेती हे आपले उत्पन्नाचे साधन असल्याचे सांगितले आहे. ६० वर्षीय दारा सिंह यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी २०१२ मध्ये यूपीच्या माध्यमिक शिक्षण मंडळातून १२वी इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण केली होती.

हेही वाचाः ए राजा यांच्या ‘त्या’ विधानावर भाजपाकडून संताप व्यक्त; रविशंकर प्रसाद म्हणाले…

रामजन्मभूमी आंदोलनात तुरुंगात गेले होते सुनील कुमार शर्मा

गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबााबाद मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुनील शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. २००७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकून ते पहिल्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये दुसऱ्यांदा आणि २०२२ मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. सुनील कुमार शर्मा (६२) हे सनातन धर्म मंदिर राजनगरचे सदस्य आहेत. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनातही भाग घेतला, त्यामुळे ते २३ ऑक्टोबर १९९० ते ७ नोव्हेंबर १९९० पर्यंत सहारनपूर मध्यवर्ती कारागृहात कैद राहिले. भाजपा आमदाराकडे १.३४ कोटींची संपत्ती आहे. आमदार म्हणून मिळणारे वेतन आणि भत्ते हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. सुनील कुमार शर्मा यांनी एमएमएच डिग्री कॉलेज गाझियाबाद, मेरठ विद्यापीठातून १९८३ मध्ये एमए पूर्ण केले. तर १९८६ मध्ये त्यांनी एमएमएच पदवी महाविद्यालयातूनच एलएलबीचे शिक्षण घेतले.

अनिलकुमार तीन वेळा आमदार

अनिलकुमार हे राष्ट्रीय लोकदलाचे आमदार आहेत. नुकताच आरएलडी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाला आहे. अनिल कुमार (४९) हे मुझफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अनुसूचित जातीतून आलेले अनिल २००७ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर ते २०१२ मध्ये दुसऱ्यांदा आणि २०२२ मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. राष्ट्रीय लोकदलाच्या आमदाराकडे ८३ लाखांची संपत्ती आहे. त्यांनी पेन्शन आणि शेती हे उत्पन्नाचे स्रोत सांगितले आहेत. अनिल यांनी १९९२ मध्ये सहारनपूर सीबीएसई बोर्डाच्या आशा मॉडर्न पब्लिक स्कूलमधून १२ वी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण केली होती.