संतोष प्रधान
भाजपबरोबर गेलेले प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे चार नेते ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. भाजपबरोबर जाण्यात हे महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जाते. ईडीचा धाक दाखवून विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात येतो. राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी छगन भुजबळ यांना अटक झाली होती. प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी झाली आहे. अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळयाचा आरोप आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीत अजितदादांवर टांगती तलवार आहे. प्राप्तिकर विभागाने या प्रकरणात अजितदादांच्या बहिणींच्या घरांवर छापा टाकण्यात आला होता.
हेही वाचा… दादानिष्ठ असल्यानेच संजय बनसोडेंना पुन्हा मंत्रिपद
हेही वाचा… दिल्लीतील बैठकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर शिक्कामोर्तब
हसन मुश्रीफ हे साखर कारखाना घोटाळ्यात अडकले आहेत. त्यांचीही ईडीची चौकशी झाली. मुश्रीफ यांना अटक होणार असे किरीट सोमय्या ठामपणे सांगत होते. भाजपबरोबर गेल्याने चौकशी थंड बस्त्यात जाते हे लक्षात आल्याने भाजपबरोबर जावे असा पक्षातील नेत्यांचा मतप्रवाह होता.