मुंबई : महाविकास आघाडीमध्ये तीन मोठे पक्ष विरुद्ध पाच डावे- समाजवादी पक्ष यांच्यात २७ विधानसभा मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. मैत्रीपूर्ण लढतींचे रुपांतर मोठे पक्ष विरुद्ध छोटे पक्ष असे झाल्याने ‘मविआ’च्या ३३ मतदारसंघांत आव्हान उभे राहिले आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०१, शिवसेना (उद्धव ठाकरे) ९५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ८६ जागा लढवत आहे. आघाडीत पाच छोटे पक्ष आहेत. त्यांची आघाडीअंतर्गत प्रागतिक आघाडी आहे. या छोट्या पक्षांना ६ जागा सोडण्यात आल्या होत्या. जागा कमी सोडल्याने या पाच छोट्या पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या पक्षांचे उट्टे काढण्यासाठी ३३ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Ambadas Danve
Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावरून ‘मविआ’त रस्सीखेच? अंबादास दानवेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य तो निर्णय…”
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

हेही वाचा – ठाणे, पालघरवर महायुतीची भिस्त

शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) चर्चेत अलिबागची जागा सुटली होती. पण ‘शेकाप’चे १६ उमेदवार मैदानात आहेत. अबू आजमी प्रदेशाध्यक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला दोन जागा सोडल्या असताना या पक्षाचे ९ उमेदवार रिंगणात आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) कळवण आणि डहाणू या दोन जागा सोडल्या होत्या, पण ‘सोलापूर मध्य’ या अधिकच्या एका मतदारसंघात या पक्षाने उमेदवार दिला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (भाकप) शिरपूर जागा सोडली आहे. पण या पक्षाचा वणी मतदारसंघात उमेदवार आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला (सकप) जागा सोडण्यात आली नसताना ‘शेकाप’च्या एबी फॉर्मवर तीन मतदारसंघांत या पक्षाने उमेदवार दिले आहेत.

हेही वाचा – लक्षवेधी लढत : बहिणीमुळे अवघड वाट, त्यात बंडखोरांचे गतिरोधक

शेकापचा आरोप

पाच छोट्या पक्षांना अधिकृतपणे सोडलेल्या सहा जागांवर आघाडीच्या मोठ्या पक्षांचे बंडखोर उभे आहेत. या बड्या पक्षांचा बंडखोरांना पाठिंबा असल्याचा आरोप छोट्या पक्षांचे नेते करत आहेत. महाविकास आघाडीअंतर्गत संघर्ष आता शिगेला पोहोचला असून मोठ्या पक्षांच्या मतदारसंघांतील प्रचाराकडे छोट्या पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. आघाडीच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांचे नेते राज्यातील डावे व पुरोगामी राजकारण संपवू पाहात आहेत, असा आरोप ‘शेकाप’चे भाई प्रा. एस. व्ही. जाधव आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले यांनी केला आहे.

Story img Loader