गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून प्रथमच खासदार झालेले डॉ.नामदेव किरसान यांचा राजकीय प्रवास सरकारी अधिकारी ते खासदार असा आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोविंदपूर येथील अतिदुर्गम, जंगलव्याप्त वनग्राममध्ये त्यांचे बालपण गेले. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते शिकले. गांधी विचारांचा प्रभाव व शिक्षणामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. इंडियन ब्युरो ऑफ माईन्स विभागात लेखापाल या पदाची नोकरी मिळाली. पुढे एम.फिल व एलएलबी तसेच एलएलएम पदवी संपादन केल्यावर त्यांना नागपूरच्या धनवटे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. प्राध्यापक म्हणून सात वर्षे अध्यापन केल्यावर त्यांनी राज्यसेवा परीक्षेद्वारे उत्पादन शुल्क विभागात अधीक्षकपदाला गवसणी घातली. पदोन्नतीने ते उपायुक्त पदापर्यंत पोहोचले, पण राजकीय क्षेत्र त्यांना खुणावत होते. अखेर प्रशासकीय सेवेला २००८ मध्ये पूर्णविराम देत ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. चळवळीतून अंगी लढाऊ बाणा भिणलेला होताच यातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. अपयश आले, पण ते खचले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा