पत्नीला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यानुसार पत्नीने उमेदवारी अर्जही दाखल केला. पण ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने पत्नीचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाचा ए व बी फार्मही जोडला होता. श्यामकुमार बर्वे यांचाही अर्ज बाद ठरविण्याचे प्रयत्न झाले. पण अर्ज पात्र ठरला.

अनपेक्षितपणे काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी मिळालेले श्यामकुमार बर्वे यांनी सेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रामटेकवर काँग्रेसचा झेंडा फडकावला. एका गावचा उपसरपंचपद भोगलेले बर्वे थेट आता दिल्लीच्या संसदेत प्रवेश केला. काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता अशी त्यांची मळ ओळक, कांद्री या त्यांच्या गावात उपसरपंच होते.

Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
dr shraddha tapre
बुलढाणा: डॉक्टर झाले, पण राजकारणात रमले! श्रद्धा टापरे ठरल्या आद्य डॉक्टर आमदार; यंदाही नऊ जण रिंगणात

हेही वाचा…अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश हाच पराभवाचा कळीचा मुद्दा; पराभूत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मत

पत्नी रश्मी बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे वडील खाण कामगार होते. यातूनच कोळसा कामगारांच्या प्रश्नांची जाण होती. त्यातून त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर वेकोलि प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले. तेथून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली आणि पुढे त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला. एक खाण कामगाराचा मुलगा खासदार झाला.