नवी दिल्लीमध्ये जी-२० शिखर परिषदेसाठी जगभरातील नेते एकत्र येऊन ‘दिल्ली घोषणापत्र’ बनविण्याची तयारी करत असताना दुसरीकडे मात्र सरकार विरुद्ध विरोधक हा देशातील जनतेसाठी परिचित असलेला राजकीय लढा पाहायला मिळाला. काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांना प्रवास करण्यापासून रोखणे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना राष्ट्रपतींनी जी-२० साठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला निमंत्रित न करणे या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शुक्रवारी (८ सप्टेंबर) आरोप केला की, जी-२० बैठकीमुळे उदयपूर ते सिकर असा हेलिकॉप्टरने प्रवास करण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली. केंद्रीय गृहखात्याने शनिवारी गहलोत यांचा दावा फेटाळून लावला. गृहखात्याने ट्विटरवर आपली भूमिका मांडतांना सांगितले की, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्यासाठी गृहखात्याने परवानगी दिली नाही, असा आरोप त्यांनी केल्याचे बातम्यांमधून कळले. मुख्यमंत्र्यांनी सीकरहून उड्डाण घेण्यासह चार विनंत्या पाठवल्या होत्या आणि त्या सर्वांना गृहखात्याने परवानगी दिली होती. राजस्थान मुख्यमंत्र्यांची कोणतीही विनंती नाकारण्यात आलेली नाही.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

गृहखात्याने पुढे म्हटले की, व्यावसायिक विमानांच्या सर्व नियोजित उड्डाणांना आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हवाई हालचालीला परवानगी दिलेली असून खासगी चार्टड विमानांच्या उड्डाणांना मात्र गृहखात्याच्या विशिष्ट मंजुरीची आवश्यकता असते.

हे वाचा >> G20 Summit 2023 : परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपतींकडून खास डिनर, मुंबईच्या ‘या’ सुप्रसिद्ध पदार्थाचीही मेजवानी

यानंतर गहलोत यांनी गृहखात्याच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले. गृहखात्याकडून चुकीची माहिती प्रसारीत करून लोकांमध्ये गैरसमज पसरविला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

अशोक गहलोत यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटले की, काल मला उदयपूरहून जयपूरला विमानाने जायचे होते. त्यानंतर जयपूर ते सिकर आणि सिकर ते निवाई पर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. यासाठी उदयपूरहून जयपूरला हेलिकॉप्टर आधीच पोहोचणे आवश्यक होते. पण उदयपूर येथून हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही. जी-२० ची बैठक असल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये जर मुख्यंमत्री उपस्थित असतील तरच उड्डाणाला परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले.

“हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी सकाळी १०.४८ वाजता ईमेलद्वारे परवानगी मागितली होती, मात्र दुपारी २.५० वाजेपर्यंत परवानगी मिळाली नाही. सिकरमध्ये लोक कार्यक्रमस्थळी वाट पाहत असल्यामुले मी दुपारी २.५२ वाजता ट्विट करून मला सिकरला पोहोचता येणार नसल्याचे सांगितले. याबद्दल मी (पीठाधीश्वर) सांगलीया पीठाचे श्री ओम दास महाराज यांनाही फोन करून माहिती दिली”, असेही गहलोत म्हणाले.

गहलोत पुढे म्हणाले की, दुपारी ३.५८ वाजता अखेर गृहविभागाकडून परवानगी मिळाली. पण तोपर्यंत मी उदयपूरहून जयपूरला विमानाने निघालो होतो आणि त्यानंतर जयपूरहून निवाई येथे रस्ते मार्गाने प्रवास केला. “जी-२० च्या नावाने मी कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही. म्हणून मी याचा निषेध न करता केवळ जनतेला वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. पण केंद्रीय गृहखाते जनतेमध्ये खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करत असल्याचे पाहिल्यानंतर मला खेद वाटत आहे”, अशी खंत गहलोत यांनी व्यक्त केली.

यासोबतच छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपालाही केंद्रीय गृहविभागाने उत्तर दिले. मुख्यंमत्री भूपेश सिंह बघेल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये नो फ्लाय झोन लागू केल्यामुळे त्यांना जी-२० साठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित राहता आले नाही. गृहविभागाने ट्विट केले, “छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांना दिल्लीत हवाई उड्डाणाला परवानगी नसल्यामुळे जी-२० च्या स्नेहभोजनाला उपस्थित राहता आले नाही, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र केंद्रीय गृहविभाग हे स्पष्ट करू इच्छितो की, जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेसाठी जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी दिल्लीत ८ ते ११ सप्टेंबर पर्यंत उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. यासाठी केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याच विमानांना परवानगी देण्यात आलेली आहे.”

विरोधकांच्या इंडिया आघाडीतील अनेक मुख्यमंत्री जसे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्नेहभोजनाला हजेरी लावण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. तर काँग्रेसच्या चार मुख्यमंत्र्यांपैकी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे या स्नेहभोजनाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना स्नेहभोजनाला निमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसने सरकारचा निषेध केला.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले की, लोकशाही असलेल्या देशाच्या सरकारने मान्यताप्राप्त विरोधी पक्षाच्या नेत्याला जागतिक नेत्यांसाठीच्या स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले नाही, ही कल्पना देखील मी करू शकत नाही. ज्या देशात लोकशाही नाही किंवा विरोधकच नाही, अशा देशांमध्येच हे घडू शकते. मी आशा करतो की, लोकशाही आणि विरोधी पक्षांचे अस्तित्त्व संपुष्टात येईल, अशा टप्प्यावर “इंडिया, दॅट इज भारत” अजून पोहोचलेला नाही.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, यांनीही केंद्र सरकारवर शुक्रवारी टीका केली. ते म्हणाले, राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्याला जेवणासाठी न बोलावून भाजपाने देशातील ६० टक्के लोकसंख्या असलेल्या जनतेचा अवमान केला आहे.

हे वाचा >> G20 Summit: अदानी-अंबानींनाही मोदी सरकारचं डिनरसाठी आमंत्रण? तर्क-वितर्कांना उधाण; नेमकं सत्य काय?

दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांना आमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसमधून विरोधाचा फारसा आवाज उमटला नाही. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश म्हणाले की, जी-२० परिषदेचे घोषवाक्य “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य” असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र “एक व्यक्ती, एक सरकार, एक व्यावसायिक समूह” यावरच विश्वास ठेवतात.

Story img Loader