Aheri Assembly Constituency Election 2024: बंड शमवण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नानंतरही जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तिन्ही विधानसभा क्षेत्रात बंडखोरी कायम राहिल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. तर गडचिरोलीतून भाजपचे डॉ. देवराव होळी यांनी माघार घेतली. मात्र, अहेरीत अम्ब्रीशराव आत्राम अपक्ष लढण्यावर ठाम असल्याने महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
४ नोव्हेंबरला नामनिर्देशन माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने गडचिरोलीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान, तिन्ही विधानसभेत विश्वजित कोवासे वगळता काँग्रेसचे बंडखोर ठाम राहिल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. यामध्ये आरमोरीत काँग्रेसचे माजी आमदार आनंदाराव गेडाम आणि डॉ. शिलू चिमुरकर यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. गडचिरोलीत विश्वजित कोवासे यांनी माघार घेतली, पण डॉ. सोनल कोवे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. तर अहेरीत हणमंतू मडावी यांनी देखील अर्ज कायम ठेवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोलीत काँग्रेस तर अहेरीत शरद पवार गटाला मतविभाजनाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी गडचिरोलीत आलेले काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी यांना फार यश आले नाही.
हेही वाचा :Maha Vikas Aghadi in Raigad: रायगडमध्ये चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर
दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने गडचिरोलीचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पक्षातर्फे समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्याबदल्यात होळी यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यांच्या मनधरणीची जबाबदारी परिणय फुके यांच्यावर होती. मात्र, अहेरीत भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम यांनी अर्ज कायम ठेवला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. अहेरीतील आत्राम राजघराण्यात पहिल्यांदाच वडील-मुलगी-पुतण्या अशी लढत होणार आहे.
हेही वाचा :Rebellion in Vidarbha: विदर्भातील १८ मतदार संघांत बंडखोरी! युती, आघाडीची कसोटी
अम्ब्रीशरावांना भाजपचे झुकते माप?
जिल्ह्यात गडचिरोली आणि आरमोरीत भाजपचे उमेदवार आहे. तर अहेरीची जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली. यातील गडचिरोलीत विद्यमान आमदार होळी यांना डावलून डॉ. मिलिंद नरोटे यांना संधी देण्यात आली. तर आरमोरीतून कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. गडचिरोलीत होळींचे बंड शमवण्यात भाजपला यश आले. मात्र, अम्ब्रीशराव आत्राम कायम आहेत. एकंदरीत राजकीय घडामोडीकडे बघितल्यास आत्राम यांचे बंड रोखण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केल्याचे दिसले नाही. काही स्थानिक भाजप पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भाजपने अम्ब्रीशराव यांना छुपा पाठिंबा देत अजित पवार गटाची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.