Premium

Loksabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आव्हान देणार्‍या सोनल पटेल कोण आहेत?

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ असा आहे, जिथे दीर्घकाळापासून भाजपाची सत्ता आहे. भाजपाचा हाच बालेकिल्ला भेदण्यासाठी काँग्रेसने महिला उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

congress loksabha candidate gandhinagar sonal patel
गांधीनगरमध्ये अमित शाह विरुद्ध सोनल पटेल अशी लढत पाहायला मिळणार आहे. (छायाचित्र-लोकसत्ता ग्राफिक टिम)

Congress Leader Sonal Patel गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रेकॉर्डब्रेक विजय होत आला आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाने जातीय समिकरणांचा योग्य वापर करत विजय मिळवला आहे. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ असा आहे, जिथे दीर्घकाळापासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच याला भाजपाचा बालेकिल्ला म्हटले जाते. भाजपाचा हाच बालेकिल्ला भेदण्यासाठी काँग्रेसने महिला उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

भाजपाकडून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना पुन्हा एकदा गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. शाह यांच्याविरोधात काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गुजरातमधील भाजपाचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गांधीनगरमध्ये अमित शाह विरुद्ध सोनल पटेल अशी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी सज्ज झाले असून, त्या अनुषंगाने त्यांनी प्रचार सभा घेण्यासही सुरुवात केली आहे.

nitin Gadkari constitution of India
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah opposes Muslim reservation in Chhatrapati Shivaji Maharajs Maharashtra
छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहा यांचा घणाघात
maharashtra assembly election 2024 raj thackeray rally in pune
‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका
yogi Adityanath batenge to katenge
‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, योगी आदित्यनाथ यांची घोषणा
shankar prasad allegation on congress
ओबीसींचे हक्क मुस्लीमांना देण्याचा घाट; रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर आरोप
maharashtra assembly election 2024 ramtek nagpur rebellion in one constituency party loyalty in another Congress MP ex minister in rebel campaign
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात

कोण आहेत सोनल पटेल?

सोनल पटेल या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी आहेत. पटेल या वास्तुविशारद असून त्या यापूर्वी गुजरात काँग्रेस महिला शाखेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्या दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांचे वडील रमणभाई पटेलदेखील काँग्रेसचे नेते होते. वडील रमणभाई पटेल अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही होते. सोनल पटेल काँग्रेसच्या सर्वात विश्वासू नेत्यांपैकी एक मानल्या जातात.

लोकसभा निवडणूक २०१९ आणि २०१४ चे निकाल

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा नेते अमित शाह प्रथमच गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ५,५७,०१४ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांना ८,९४,६२४ मतं (६९.५८ टक्के) मिळाली होती. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. सी. जे. चावडा यांचा पराभव केला होता; ज्यांना ३,३७,६१० (२६.२६ टक्के) मतं मिळाली होती. दोघांच्याही मतांची एकूण संख्या १२,८४,०९० होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे दिग्गज नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी सहाव्यांदा ही जागा जिंकली होती. त्या निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी यांना ७,७३,५३९ (६८.०३ टक्के) मतं मिळाली होती. अडवाणी यांनी काँग्रेसचे उमेदवार किरीटभाई ईश्वरभाई पटेल यांचा ४,८३,१२१ मतांनी पराभव केला होता. पटेल यांना २,९०,४१८ (२५.५४ टक्के) मतं मिळाली होती. या निवडणुकीत आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार ऋतुराज मेहता १९,९६६ (१.७६ टक्के) मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.

काँग्रेससमोर गांधीनगरचा गड भेदण्याचे आव्हान

  • लालकृष्ण अडवाणी (भाजपा): २००९
  • लालकृष्ण अडवाणी (भाजपा): २००४
  • लालकृष्ण अडवाणी (भाजपा): १९९९
  • लालकृष्ण अडवाणी (भाजपा): १९९८
  • विजयभाई पटेल (भाजपा): १९९६ पोटनिवडणूक
  • अटल बिहारी वाजपेयी (भाजपा): १९९६
  • लालकृष्ण अडवाणी (भाजपा): १९९१
  • शंकरसिंह वाघेला (भाजपा): १९८९
  • जी.आय. पटेल (काँग्रेस): १९८४
  • अमृत ​​पटेल (भाजपा): १९८०
  • पुरुषोत्तम गणेश मावळणकर (बीएलडी): १९७७

गांधीनगर लोकसभा मतदारसंघ

गांधीनगर हा गुजरातमधील लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघात १९८९ पासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून, लालकृष्ण अडवाणी आणि अगदी अलीकडे अमित शाह यांसारख्या उल्लेखनीय व्यक्तींनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. अडवाणी यांनी मध्ये गांधीनगर मतदारसंघातून १९९१, १९९८, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ असा तब्बल सहा वेळा विजय मिळवला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये एकदा ही जागा जिंकली होती. परंतु, आपला लखनौ मतदारसंघ कायम ठेवण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही जागा सोडली.

हेही वाचा : Elections 2024 : “मोदींना घरी पाठविणार, मगच झोप घेणार” – उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

गांधीनगरमध्ये केवळ १९८४ साली काँग्रेस या जागेवरून विजयी झाली होती. अमित शाह यांनीदेखील यंदाच्या निवडणुकीत १० लाखाहून अधिक मतांनी निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपाचा हा बालेकिल्ला भेदण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gandhinagar congress loksabha candidate sonal patel rac

First published on: 27-03-2024 at 08:30 IST

संबंधित बातम्या