नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघात उमेदवारी नाकारली गेल्याने बंडाचे निशाण फडकवित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांच्या समर्थक पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.

गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश होताच रविवारी बेलापूर मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यामध्ये बहुसंख्य समर्थक हे संदीप यांच्यासोबत ‘तुतारी’ची साथ धरणारे होते. विशेष म्हणजे, नाईक यांनी मंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच त्यांच्या कार्यालयीन व्यवस्थेची आखणी करण्यात संदीप स्वत: सक्रिय झाल्याचे वृत्त असून आगामी महापालिका निवडणुकांची गणिते लक्षात घेता वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रभाव राखून असलेले त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेशाची चाचपणी करु लागले आहेत.

bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Setback to Sena (UBT) in Pune 5 ex corporators of party set to join BJP
पाच माजी नगरसेवक करणार मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश; पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का
Loksatta lalkilla Congress BJP campaign AAP alleges corruption Sheila Dikshit
लालकिल्ला: काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम!
BJP plans bmc elections aiming to elect 40 corporators
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी, उत्तर मुंबईत ४० नगरसेवक निवडून आणणार, पियुष गोयल यांचा निर्धार

हेही वाचा – रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी

बेलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप नाईक यांचा अवघ्या ३७७ मतांनी पराभव झाला. राज्यभर महायुतीची लाट असताना संदीप यांनी मंदा म्हात्रे यांना अखेरच्या फेरीपर्यंत विजयासाठी झुंजविले. निवडणुकीला जेमतेम २१ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना संदीप यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश करत असताना भाजपमधील त्यांच्या समर्थकांचा मोठा गट त्यांनी सोबत घेतला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात भाजपचे २५ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा गट संदीप यांच्यासोबत राहिला. हे करत असताना ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये फुट पडणार नाही याची पुरेपूर दक्षता नाईक कुटुंबियांनी घेतली. स्वत: गणेश नाईक या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर रिंगणात होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांचा एक मोठा गट बेलापूरमध्ये संदीप यांच्यासाठी तुतारी चिन्हावर मताचा जोगवा मागत होता तर ऐरोलीत कमळ चिन्हासाठी नाईक समर्थक सक्रिय होते. या दुहेरी भूमिकेचा काही प्रमाणात फटका संदीप यांना बेलापूर मतदारसंघात बसला. तरीही त्यांनी मिळवलेली मते लक्षणीय ठरली.

गणेश नाईक यांचा रविवारी मंत्रिमंडळात समावेश निश्चित होताच नवी मुंबईत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर सलग दहा वर्षे मंत्रिपदापासून नाईक यांना दूर रहावे लागले होते. संदीप नाईक यांच्या आग्रहामुळे नाईक यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेलापूर मतदारसंघावर त्यांना पाणी सोडावे लागले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही अडीच वर्षे त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून पुन्हा मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. हा सगळा घटनाक्रम नाईक समर्थकांना अस्वस्थ करणारा होता. मात्र मंत्रिमंडळात समावेश होताच नाईक समर्थकांना पुन्हा एकदा ‘अच्छे दिना’ची अनुभूती येऊ लागली असून संदीप यांच्या सोबत पक्ष सोडलेल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आता भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत.

महापालिका निवडणुकांपूर्वी चाचपणी ?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नवी मुंबईतील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वर्चस्व राखून असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेण्याचा आग्रह स्वत: गणेश नाईक यांच्याकडून धरला जाण्याची शक्यता आता व्यक्त होते आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप यांचा पराभव झाला असला तरी नेरुळ, सानपाडा अशा काही विभागांमध्ये त्यांना मिळालेली मते लक्षणीय ठरली. वाशीतील ठराविक प्रभागांमध्ये संदीप पिछाडीवर पडले असले तरी त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांचा स्थानिक पातळीवरील प्रभावाचा भाजप नेतृत्वालाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे संदीप आणि त्यांच्या समर्थकांना पुन्हा पक्षात घेण्यासंबंधी नव्याने विचार केला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मंत्री पदाच्या आमंत्रणानंतर संदीप सक्रिय ?

गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय पक्का होताच संदीप नाईक देखील सक्रिय झाल्याचे सुत्रांनी सांगितले. नाईक यांनी मंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच त्यांच्या कार्यालयीन व्यवस्थापनाची आखणी संदीप यांनी सुरु केली असून नाईक यांच्यासोबत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, शासकीय स्वीय सहाय्यक तसेच नवी मुंबई महापालिकेतील कामांविषयीचे समन्वयाची आखणी करण्यात ते आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – राज्यात कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर, विरोधी पक्षांचा सरकारवर आरोप; चहापानावर बहिष्कार

गणेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकर आनंदी होणे स्वाभाविक आहे. दहा वर्षांनंतर शहराला पुन्हा मंत्रिपद मिळाल्याने नवी मुंबई आता विकासाच्या आघाडीवर थांबणार नाही. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागले असले तरी नाईक यांच्या प्रती आम्हाला असलेला आदर जगजाहीर आहे. येत्या काळात राजकीय दिशा काय असेल हे आता सांगणे अवघड असले तरी जे होईल ते नवी मुंबईच्या हिताचे असेल. – दशरथ भगत, माजी नगरसेवक

Story img Loader