नवी मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी सायंकाळी मोठया धुमधडाक्यात वाशी येथे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ केला. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक मातब्बर नेते, पदाधिकारी या सोहळ्या उपस्थित राहीले. वाशी सेक्टर नऊ येथील मोक्याच्या ठिकाणी निवडणुकपूर्व जनसंपर्कासाठी हे कार्यालय सुरु करत म्हात्रे यांनी आपण पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हात्रे यांच्या कार्यालयाकडे नवी मुंबईतील पक्षाचे बडे नेते गणेश नाईक यांचा एकही समर्थक फिरकला रात्री उशीरापर्यंत फिरकला नाही. शिंदेसेनेचे नेते म्हात्रे यांच्या समर्थनासाठी झाडून उपस्थित रहात असताना नाईक समर्थकांच्या अनुपस्थितीमुळे नवी मुंबईतील दादा-ताईमधील बेबनाव पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत हे मताधिक्य बरेच कमी असले तरी नवी मुंबईत भाजपचा पराभव करणे सोपे नाही याची जाणीव यानिमीत्ताने पुन्हा एकदा विरोधकांना झाली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा ऐरोलीच्या तुलनेत भाजपला पोषक असलेला मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात ५० टक्के मराठी, १७ टक्के उत्तर भारतीय, दहा टक्के आगरी-कोळी भूमीपुत्र, नऊ टक्के दक्षिण भारतीय, सात टक्के मुस्लिम, तीन टक्के गुजराती, दोन टक्के मागासवर्गीय तर २ टक्के ख्रिश्चन समाजाची मते आहेत. या मतदारसंघातील उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि गुजराती मते ही गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या पथ्यावर पडत आली आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी भाजपच्या चिन्हावर मातब्बर नेते गणेश नाईक यांचा येथून पाडाव केला. तेव्हापासून बेलापूर मतदारसंघात भाजपचा दबदबा अजूनही कायम आहे.

Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Ruta Awhad Sparks Controversy osama bin laden apj abdul kalam
Video: “ओसामा बिन लादेन दहशतवादी म्हणून जन्मला नाही, त्याला समाजानं…”, जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून अब्दुल कलाम आणि लादेन यांची तुलना
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
pune liquor ban ganeshotsav marathi news
मद्यविक्रीबंदीने गुन्हे कमी होणार का? मद्य विक्रेत्यांचा सवाल; पुढील वर्षी जिल्ह्यात बंदीची गणेश मंडळांची मागणी
Mahendra Thorve, Mahendra Thorve security guard,
रायगड : आमदार थोरवेंच्या सुरक्षा रक्षकावर मारहाणीचा आरोप.. थोरवे यांच्याकडून आरोपांचे खंडन

हेही वाचा : हसन मुश्रीफ – समरजितसिंह घाटगे यांच्यातील संघर्षाला अधिक धार

म्हात्रे-नाईक रस्सीखेच

सलग दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्यानंतर यंदा बेलापूर मतदारसंघातून म्हात्रे यांना स्वपक्षातील गणेश नाईक यांच्या कुटुंबातूनच आव्हान उभे राहीले आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी नाईक यांचे माजी आमदार पुत्र संदीप नाईक इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकांचा हंगाम संपताच संदीप यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. नाईक यांना मानणारे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, प्रभागनिहाय दौरे करण्यास संदीप यांनी सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:चे मतदान हे ऐरोलीतील त्यांच्या बोनकोडे या मुळ गावातून काढून बेलापूर येथे स्थलांतरित केले आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या येथून पुन्हा निवडणुक लढविण्यास इच्छुक असताना संदीप यांनी आक्रमकपणे आखलेली ही रणनिती येथील राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

मंदा म्हात्रे यांचे वाशीत ठाण

संदीप नाईक यांनी आक्रमकपणे बेलापूर मतदारसंघाचे दौरे सुरु केले असताना मंदा म्हात्रे यांनी रविवारी वाशी सेक्टर नऊ येथे मध्यवर्ती ठिकाणी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय सुरु केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वाशी हे नवी मुंबईचे मध्यवर्ती उपनगर असून याठिकाणी कार्यालय सुरु करुन मंदा म्हात्रे यांनी पुढील तीन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने महत्वाचे पाउल उचलले आहे. आपण बेलापूरमधून लढण्यास पुन्हा इच्छुक असल्याचा संदेश यानिमीत्ताने देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यालयाच्या शुभारंभ सोहळ्याच्या निमीत्ताने त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के, पक्षाचे संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्यासह शिंदेसेनेतील महत्वाचे पदाधिकारी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहील्याचे पहायला मिळाले. वाशी तसेच आपसाच्या उपनगरातील म्हात्रे समर्थक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. असे असले तरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह नाईक समर्थक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. पक्षाचा राज्यस्तरीय नेते अथवा पदाधिकारीही या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते. त्यावर म्हात्रे यांनी स्पष्टीकरण देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने तसेच हा कार्यक्रम पुर्वनियोजीत असल्याने आपण राज्यस्तरीय नेत्यांना आमंत्रण दिले नव्हते असे सांगितले.

हेही वाचा : सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात इच्छुकांची संख्या वाढली

नवी मुंबईतील पक्षाच्या सर्व नेत्यांना तसेच माजी नगरसेवकांना आपण निमंत्रण दिले होते. मात्र काही जण या कार्यक्रमासाठी आले नाहीत. सर्वांचा मान-सन्मान करणे मी माझे कर्तव्य समजते. प्रत्यक्ष सोहळ्याला अनेक जण आले नसतील मात्र सर्वांच्या शुभेच्छा माझ्यामागे कायम आहेत हा मला विश्वास आहे.

मंदा म्हात्रे, आमदार बेलापूर

स्थानिक आमदारांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करायला हवे. पक्ष कार्यकर्त्यांना सन्मान द्यायला हवा. निवडणुका आल्यावर कार्यालय उघडून ऐनवेळेस निमंत्रणे धाडून कार्यकर्त्यांची मने जिंकता येतील या भ्रमात कुणी राहू नये. आम्हाला यापुर्वी सन्मानाने वागविले असते तर कार्यालयाच्या उद्घाटनाला नक्की गेलो असतो. परंतु जागोजागी झालेले अपमान सर्वसामान्य कार्यकर्ते विसरलेले नाहीत.

रविंद्र इथापे, उपाध्यक्ष नवी मुंबई भाजप