भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याच्या काही तास आधीच पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. गंभीर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून मी माझ्या क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन.” पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनासुद्धी गंभीर यांनी टॅग केले आहे. “मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहजी यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद,” असंही ते म्हणालेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाला आणखी एक संधी द्यायची होती

भाजपाच्या एका सूत्राने सांगितले की, “पक्ष त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा विचार करीत होता, परंतु पूर्व दिल्ली किंवा राजधानीतील इतर कोणत्याही जागेवरून ती उमेदवारी मिळणार नव्हती. विशेष म्हणजे हा निर्णय त्यांना कळवण्यात आला होता.” “गुरुवारी रात्री भाजपा केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीपूर्वी झालेल्या संघटनात्मक बैठकीत पहिल्या यादीसाठी नावे तयार करण्यात आली होती. बैठकीत एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याने गंभीरचे योग्य उमेदवार असे वर्णन केले होते. मंत्री म्हणाले होते की, ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघात प्रति बूथ ३७० हून अतिरिक्त मते मिळतील हे सुनिश्चित करू शकतात. उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपा नेतृत्वाने ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचाः Loksabha Poll 2024 : भाजपाकडून राजस्थानमधील १५ जागांसाठी उमेदवार जाहीर; ‘या’ तीन जागांवर करावा लागू शकतो आव्हानांचा सामना!

जेटलींच्या सांगण्यावरून गंभीर राजकारणात आले

भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, गंभीर आता देशात नव्हे तर दिल्लीत तरी क्रिकेट प्रशासनाची जबाबदारी घेण्याचा विचार करीत आहेत. खरे तर क्रिकेट प्रशासनानेच गंभीर यांना राजकारणात येण्याची प्रेरणा दिली. दिल्ली भाजपा नेत्यांनी सांगितले की, गंभीर यांचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि त्यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात डीडीसीए अध्यक्ष म्हणून जेटली यांचा कार्यकाळ गंभीर यांनी जवळून पाहिला होता. २०१९ मध्ये मृत्यू होईपर्यंत ते या पदावर होते. जेटलींच्या सांगण्यावरूनच गंभीर यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

एका नेत्याने सांगितले, “मार्च २०१८ मध्ये गौतम गंभीर यांच्यासाठी पद्मश्री जाहीर झाल्यानंतर लगेचच अरुण जेटलींनी त्यांना पक्षात येण्याचा विचार करण्यास सांगितले होते. गंभीर यांनी पक्षात सामील होण्यास सहमती दर्शवली. गंभीर यांनी मार्च २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आणि क्रिकेट समालोचक म्हणूनही काम सुरू ठेवले. त्यानंतर लगेचच गंभीर यांना भाजपाच्या पूर्व दिल्लीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. दिल्लीत भाजपाच्या लाटेवर स्वार होऊन गंभीर पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून विजयी झाले. त्यांना सात लाख मते मिळाली.सामाजिक कार्यातून गंभीर यांनी पूर्व दिल्लीत मोठा जनाधार मिळवल्याचेही भाजपा नेते मान्य करतात. जन रसोई आणि कम्युनिटी किचन या योजना लोकप्रिय ठरल्या. त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. तसेच ईस्ट दिल्ली प्रीमियर लीगसुद्धा सुरू केले, जे गरीब कुटुंबातील तरुण क्रिकेटपटूंना कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी देते. जून २०२३ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित असलेल्या कार्यक्रमात गंभीर यांचा पूर्व दिल्लीतील मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन भाजपा आमदारांशी कथितपणे संघर्ष झाला होता. “या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी बरेच लोक होते, जे केवळ गंभीर यांच्या निवडणूक प्रचाराचा भागच नव्हते, तर ते खासदार झाल्यानंतर त्यांना सातत्याने मदत करीत होते,” असे भाजपा नेत्याने सांगितले.

हेही वाचाः भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

गंभीर बैठकीला उपस्थित नव्हते

गंभीर यांच्यासाठी राजकारणात प्रवेश करणे सोपे होते. मात्र त्यांचा कार्यकाळ गोंधळाने भरलेला होता. त्यांनी वारंवार दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आणि अनेकदा आप नेत्यांशी जोरदार वाद घातला होता. पक्षांतर्गत अडचणींमुळे त्यांची मोठी गैरसोयही झाली होती. २०१९ मध्येच दिल्ली भाजपाच्या वर्तुळात अशी कुणकुण होती की, ते पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. गंभीर यांच्याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपा नेतृत्वाकडे तक्रार केली होती की, ते संघटनात्मक बैठकांना अनुपस्थित असतात. गेल्या महिन्यात (फेब्रुवारी) दिल्लीत झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही हजेरी लावली नव्हती. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह स्वतः या अधिवेशनाला उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir left politics and returned to the cricket world what is the real reason vrd
Show comments