Gavit family in Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. या जिल्ह्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच संधीसाधू नेत्यांनी इथलं राजकारण ढवळून काढलं आहे. राज्यात युती आणि आघाडीमधील पक्षांची अदलाबदल झाल्यानंतर या जिल्ह्यात राजकीय अस्थैर्य निर्माण झालं आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्षदेखील चव्हाट्यावर आला आहे. गावितांच्या कुटुंबातील अनेक सदस्य या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये विजयकुमार गावितांची कन्या, माजी खासदार हिना गावित यांचाही समावेश आहे. नंदुरबारमधील चार वेगवेगळ्या मतदारसंघात विजयकुमार गावितांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार म्हणून उभे आहेत. विशेष म्हणजे गावितांच्या कुटुंबातील दोन सदस्य राज्याच्या व देशाच्या राजकारणातील दोन सर्वात मोठे कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटांवर निवडणुकीला सामोरे जात आहेत. इतर दोन सदस्य अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

गावित कुटुंबाचे प्रमुख विजयकुमार गावित (६९) हे नंदुरबारमधून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकदा अपक्ष म्हणून, तीन वेळा संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर, तर दोन वेळा भाजपाच्या तिकिटावर ते आमदार म्हणून विधानसभेवर गेले आहेत. आतापर्यंत अनेक सरकारांमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते, सध्या ते आदिवासी विकास मंत्री आहेत.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
caste equation will be decisive in yavatmal district for maharashtra assembly election 2024
Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हे ही वाचा >> Chhatrapati Sambhajinagar Assembly Constituency: जरांगे यांच्या ‘मराठा- मुस्लिम व दलित’ मतपेढीसाठी ओवेसी  यांची सहमती

नंदूरबारमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान

नंदुरबार जिल्ह्यात ७० टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. येथील बहुसंख्य जनता ही मानवी विकास निर्देशांकात तळाशी आहे. येथील रहिवाशांचे दरडोई उत्पन्न हे राज्यातील जनतेच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा एक दशांश आहे. येथील बहुसंख्य जनता ही शासकीय मदतीवर अवलंबून आहे. गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्यात राजकीय घराणेशाही पाहायला मिळत आली आहे. तसेच येथील मतदार हा प्रामुख्याने काँग्रेस व गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ होता.

हे ही वाचा >> उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला

काँग्रेसपाठोपाठ नाईक व रघुवंशी कुटुंबाचं प्रस्थ मोडून काढलं

पूर्वी या जिल्ह्यात रघुवंशी व नाईक कुटुंबांनी मोठं प्रस्थ निर्माण केलं होतं. बटेसिंह रघुवंशी व सुरुपसिंह नाईक या नेत्यांचा संपूर्ण जिल्ह्यावर मोठा प्रभाव होता. मात्र, १९९५ मध्ये विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील रघुवंशी व नाईक कुटुंबयांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान दिलं. गावित हे वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. १९९५ च्या निवडणुकीच्या दोन महिने आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. राज्य परिवहन महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले शरद गावित व राज्य सचिवालयात लिपिक म्हणून काम करणारे राजेंद्र गावित या दोन भावांचा विजयकुमार गावितांना भक्कम पाठिंबा मिळाला होता.

हे ही वाचा >> Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक

विजयकुमार गावितांनी भावांनाही राजकारणात आणलं

त्या विजयानंतर गावितांनी तत्कालीन भाजपा व शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा दिला. तसेच ते राज्यमंत्रीदेखील झाले. त्यानंतर तिथल्या राजकारणात अनेक बदल झाले. गावितांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. या पक्षाच्या तिकिटावर ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळातही ते मंत्री झाले. २०१४ च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला. या काळात त्यांनी आपल्या भावांना इतर पक्षांच्या तिकिटांवर निवडणुका लढवायला सांगितलं.

हे ही वाचा >> महायुतीतील बंडखोरांवर कारवाईची केवळ घोषणाच! भाजपकडूनही हकालपट्टीचा निर्णय प्रलंबित

शरद व राजेंद्र गावितांना विजयकुमार गावितांसारखं यश मिळवता आलं नाही

२००९ मध्ये शरद गावित समाजवादी पार्टीच्या तिकिटावर नवापूरमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, तर २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळवता आलं नाही, तर राजेंद्र गावित यांनी २०१४ मध्ये शाहदा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर, २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयश आलं.

हे ही वाचा >> बालेकिल्ला राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान, अकोला पश्चिममध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी अडचण

गावित कुटुंबातील चार सदस्य विधानसभेच्या रिंगणात

दरम्यान, २०१४ व २०१९ मध्ये विजयकुमार गावितांची कन्या हिना गावित या नंदुरबारमधून लोकसभेची निवडणूक जिंकल्या. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, गावित कुटुंबाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. या कुटुंबातील अनेक सदस्य जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांतून वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटांवर अथवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. विजयकुमार गावित हे स्वतः भाजपाच्या तिकिटावर नंदुरबारमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसच्या किरण तडवींनी आव्हान दिलं आहे.

हे ही वाचा >> बालेकिल्ला राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान, अकोला पश्चिममध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी अडचण

तर भाजपाला रामराम करून काँग्रेसमध्ये गेलेल्या राजेंद्र गावितांना शहाद्यातून उमेदवारी मिळाली आहे. येथील भाजपाचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्यासमोर राजेंद्र गावितांनी आव्हान उभं केलं आहे, तर शरद गावित हे नवापूरमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे भरत गावित निवडणूक लढवत आहेत. विजयकुमार गावितांची कन्या हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. येथे त्यांची शिवसेनेच्या (शिंदे) आमश्या पाडवी आणि काँग्रेस उमेदवार तथा विद्यमान आमदार के. सी. पाडवी यांच्याशी लढत होणार आहे.