“मी कधीपासून मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे पण, हे पद मला सोडत नाही. ते मला कधी सोडेल असे वाटत नाही”, अशी मिश्किल टिप्पणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली. पण, या टिप्पणीमधून गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर आपलाच हक्क असल्याचे स्पष्ट केले. सचिन पायलट तसेच, केंद्रीय नेतृत्वाला दिलेला हा अप्रत्यक्ष इशारा असल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर गेहलोत म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून तर त्यांनी मला मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवले आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. खरेतर कोणी पदाची अभिलाषा बाळगू नये. मोदींविरोधात थेट लढणारे देशात राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, त्यांचे हात मजबूत केले पाहिजेत, त्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Shinde group, NCP Ajit Pawar party,
लाडकी बहीण योजनेतून राष्ट्रवादीने ‘ मुख्यमंत्री ’ शब्द वगळल्याबद्दल शिंदे गटाचा आक्षेप, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा
Anil Vadpalliwar said eknath shinde and devendra Fadnavis misunderstood that petition is not against Ladki Bahin scheme
शिंदे, फडणवीसांचा गैरसमज, ती याचिका ‘लाडकी बहीण’ योजनेविरूद्ध नाही, वडपल्लीवार म्हणाले…
Sharad Pawar, NCP, Chief Minister, Maha Vikas Aghadi, Uddhav Thackeray, Shiv Sena, Congress, Sanjay Raut,
मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला

हेही वाचा – बुलडाणा : तलाठी अहिर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संघाचे धरणे

राजस्थानमध्ये मतदार काँग्रेस सरकार वा आमदारांविरोधात नाहीत, असा दावा गेहलोत यांनी केला. मात्र, हा मुद्दा पटवून देताना त्यांनी सचिन पायलट यांच्यावर अप्रत्यक्ष ताशेरे ओढले. भाजपवाले लोकनियुक्त सरकारे पाडतात, राजस्थानमध्येही तसा प्रयत्न केला होता. काँग्रेसच्या आमदारांना १० कोटींची ऑफर दिली होती. पण, मला माझ्यावर आमदारांवर विश्वास होता. तत्कालीन प्रभारी अजय माकन यांनी ११२ आमदारांच्या भावना समजून घेतल्या. हे सगळे आमदार माझ्यासोबत राहिले. आम्ही हॉटेलमध्ये होतो, तेव्हा जनतेचे आमदारांना फोन येत होते. त्यांनी आमदारांना सांगितले होते की, गेहलोतांच्या पाठिशी उभे राहा, कितीही दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले तरी चालेल पण, सरकार कोसळू देऊ नका. आमदारांनी लोकांचे म्हणणे ऐकले, असे म्हणत गेहलोतांनी पायलटांना टोला हाणला.

राजस्थानात पुन्हा काँग्रेसच!

सचिन पायलटांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमध्ये गेहलोत यांनी राजस्थानच्या विधानसभेत विश्वासदर्शक मांडण्याचा प्रस्ताव राज्यपालांसमोर मांडला होता. त्यासंदर्भात गेहलोत म्हणाले की, मी विश्वासदर्शक ठराव मांडायला तयार होतो पण, राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवायला तयार नव्हते. मी मागे लागलो तरी ते नको म्हणत होते. अधिवेशनाची तारीख ठरली तशी आमदारांना दिलेली ऑफर वाढत गेली. रक्कम १० कोटींवरून ४० कोटींवर गेली. महाराष्ट्रात काही आमदारांना ५० कोटी दिल्याचे मी ऐकले आहे. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवूनदेखील आमदार माझ्यासोबत राहिले. त्यांनी पैसे घेतले नाहीत मग, त्यांना भ्रष्ट कसे म्हणणार? माझ्याविरोधात वा आमदारांविरोधात जनतेचा राग नाही. माझ्या सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोपही नाही. त्यामुळे काँग्रेसच पुन्हा जिंकून येईल, अशी ग्वाही गेहलोत यांनी दिली.

मतभेद मिटल्याचा दावा

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यामध्ये मध्यस्थी करून वाद मिटवल्याचे सांगितले जाते. पण, गेहलोत सातत्याने पायलटांच्या बंडाचा उल्लेख करत असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वादामुळे राजस्थानमधील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर झालेली नाही. मात्र, गेहलोत यांनी पायलट यांच्याशी मतभेद नसल्याचा आरोप फेटाळला. “बंडाच्या वेळीदेखील मी ‘फर्गेट अँड फरगिव्ह’ असे म्हणालो होतो. मी आता मतभेद विसरलो आहे. आम्ही एकजुटीने काम करत आहोत. पायलटांच्या समर्थक आमदारांनाही पुन्हा उमेदवारी दिली जात आहे. विजयाची क्षमता हाच मुद्दा प्रमुख आहे”, असे म्हणत गेहलोतांनी मतभेदाचे खापर भाजपवर फोडले. सचिन पायलट आणि माझ्यात अजून भांडण कसे झाले नाही, असे भाजपवालेच विचारत असतात, असे गेहलोत म्हणाले.

हेही वाचा – वर्धा : ऑनलाईन कामे करणार नाही म्हणत ठिय्या आंदोलन सुरू

माझ्यामुळे वसुंधरा राजेंवर अन्याय नको!

भाजपच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंवर त्यांच्या पक्षामध्ये अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर गेहलोत यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला टोला हाणला. “माझ्यामुळे वसुंधरा राजेंना शिक्षा कशासाठी देता? त्यांच्यावर अन्याय करू नका”, असे गेहलोत म्हणाले. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री भैरवसिंह शेखावत परदेशात असताना भाजपमधील आमदारांनी त्यांचे सरकार पाडण्याचे कट-कारस्थान केले होते. शेखावत यांचे निष्ठावान कैलाश मेघवाल यांनाही कटाची माहिती मिळाली होती. भाजपचे सरकार पाडण्याच्या कटात मी सामील झालो नाही. त्या घटनेचा उल्लेख कैलाश मेघवाल यांनी माझे सरकार अडचणीत आले तेव्हा केला होता. कैलाश मेघवाल हे वसुंधरा राजेंचे निष्ठावान आहेत. मेघवाल म्हणाले की, सरकार पाडण्याची राजस्थानमध्ये परंपरा नाही. त्यांच्या या विधानाचा मी जाहीर उल्लेख केला होता व वसुंधरा राजेही मेघवाल यांच्याशी सहमत आहेत असे मी म्हणालो होतो, अशी पार्श्वभूमी सांगत गेहलोत यांनी भाजपचे नेतृत्व वसुंधरा राजेंवर विनाकारण नाराज असल्याचे मत व्यक्त केले.

मी अधिक फकीर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला फकीर मानतात पण, मी त्यांच्यापेक्षा अधिक फकीर आहे. माझ्याकडे जमीन नाही, संपत्ती नाही. माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या बायकोने ९० हजारांचा चेक मला दिला होता, असे गेहलोत म्हणाले.

लोक माफ करणार नाहीत…

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असतानाही सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणा नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकत आहेत. खरेतर आचारसंहितेमध्ये हे छापे थांबले पाहिजेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला पाहिजे. देशाचे गृहमंत्री कोणाचे ऐकत नाहीत. पंतप्रधान मोदींनी त्यांना सूचना केली पाहिजे. तपास यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा चालूच राहिला तर लोक माफ करणार नाहीत, असा इशारा गेहलोत यांनी दिला.