आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत म्हणून युती, आघाडीच्या शक्यतेचीही महत्त्वाच्या पक्षांकडून चाचपणी केली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये मात्र सपा, बसपा या पक्षांनी वेगळाच मार्ग निवडला आहे. समाजवादी पार्टीने काँग्रेस, बसपा या मोठ्या पक्षांशी युती न करण्याचे धोरण अवलंबले आहे. छोट्या पक्षांना सोबत घेत लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सपाने सुरू केली आहे. सपाच्या या भूमिकेनंतर बसपा अर्थात बहुजन समाज पार्टी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत बसपाचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल यांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा >>> रामचरितमानसवरून पुन्हा एकदा JDU-RJD आमनेसामने; जेडीयूचा नेता म्हणाला, “आता कुराण आणि बायबल…”

maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
bhandara pavani constituency tradition that the voters of this constituency rejected the existing mlas
भंडारा : विद्यमानांना नाकारण्याची परंपरा यंदाही कायम राहणार?
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
Challenges facing by shinde shiv sena candidate in Maharashtra state assembly elections 2024
Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

आमची सामान्य जनतेशी युती

२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा यांच्यात युती होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या आव्हानात्मकतेबद्दल विश्वनाथ पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या निवडणुकीत आमच्यापुढे कोणतेही आव्हान नाही. बसपाची येथील सामान्य जनतेशी युती आहे. येथील मुस्लीम, ओबीसी, एससी, एसटी, उच्च जातीतील मतदार यांच्याशी आमची युती आहे. हीच युती आणि बंधुत्वाच्या जोरावर आम्ही जिंकणार आहोत,” असा विश्वास विश्वनाथ पाल यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> मोदी सरकारचा नववा वर्धापन दिन; मोदींची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जाहिराती केल्या जाणार

भाजपाला थोपवायचे असेल तर बसपाशिवाय पर्याय नाही

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सपा आणि बसपा या पक्षांकडून मुस्लीम मतांना स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी या पक्षांकडून वेगवेगळे कार्यक्रम, सभा, समारंभ आयोजित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत मुस्लीम मते कोणाला मिळणार? असा प्रश्न विश्वनाथ पाल यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, “२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा समाजवादी पक्षाला पाठिंबा होता. मात्र भाजपाला थोपवायचे असेल तर बसपाशिवाय पर्याय नाही, हे मुस्लीम मतदाराला समजले आहे. मुस्लीम तसेच इतर समाज बसपाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत,” असा दावा पाल यांनी केला.

हेही वाचा >>> ठाकरे गट फुटत नसल्याने नागपूरमध्ये शिंदे गटाकडून मनसेला खिंडार; नागपूर जिल्हा सचिवाचा पक्षप्रवेश

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी बसपा आणि सपा यांची युती होणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर त्याचा फायदा भाजपाला होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.