आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशभरातील पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवणुकीत उत्तर प्रदेश राज्याला महत्त्वाचे स्थान आहे. येथील विधानसभेत सध्या विरोधी बाकावर असलेला समाजवादी पक्ष काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव देशातील अन्य महत्त्वाच्या आणि मोठ्या पक्षांशी युती करण्याचा मन:स्थितीत नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील छोट्या पक्षांशी युती करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न समाजवादी पार्टीकडून केला जणार आहे.
हेही वाचा >>> विरोधकांच्या ‘त्या’ पत्रावर प्रमुख नेत्यांच्या सह्या, नितीशकुमार मात्र दूरच, जेडू(यू) ची आगामी राणनीती काय?
मित्रपक्षांनाच जास्त फायदा होतो
अखिलेश यादव आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी, काँग्रेस यासारख्या मोठ्या पक्षांशी युती करणार नाहीत. त्याऐवजी ते छोट्या पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार आहेत. हा निर्णय घेण्यामागे काही कारणं सांगितली जात आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे छोट्या पक्षांशी युती करून समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरं कारण म्हणजे छोट्या पक्षांशी युती करून समाजवादी पार्टी जागावाटपावर स्वत:चे वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच मोठ्या पक्षांसोबत युती केल्यामुळे आम्हाला फायदा न मिळता मित्रपक्षांचाच जास्त फायदा होतो, असा समाजवादी पार्टीच्या नेत्यांना वाटते. म्हणूनच आगामी लोकसभा निवडणुकीत हा पक्ष छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहे.
हेही वाचा >>> अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या लोकसभेतील उमेदवारीला बळ
२०१९ साली बसपालाच फायदा झाला
पक्षाच्या या भूमिकेबाबत समाजवादी पार्टीच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. “२०१९ साली समाजवादी पार्टीने बहुजन समाज पार्टीशी युती केली होती. या निवडणुकीत समाजवादी पार्टीने एकूण ३७ जागा लढवल्या होत्या. मात्र आमच्या पक्षाला फक्त पाच जागांवरच विजय मिळाला. याच निवडणुकीत आमचे तत्कालीन मित्रपक्ष बसपाने एकूण ३८ जागा लढवल्या होत्या. त्यांचा १० जागांवर विजय झाला होता. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. म्हणजेच या युतीमध्ये बसपाचा फायदा झाला. मात्र आम्हाला काहीही मिळाले नाही,” असे हा नेता म्हणाला.
हेही वाचा >>> Karnataka Election : येडियुरप्पांच्या निष्ठावंतांवर निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी, शोभा करंदालजे कोण आहेत?
छोट्या पक्षांना सोबत घेतल्यामुळे जागा वाढल्या
२०२२ साली पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने राज्यातील छोट्या पक्षांशी हातमिळवणी केली होती. यामध्य राष्ट्रीय लोकदल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (एसबीएसपी), अपना दल (कामेरावादी), जनवादी सोशालिस्ट पार्टी, महान दल अशा छोट्या पक्षांना अखिलेश यादव यांनी सोबत घेतले होते. या छोट्या पक्षांचा बिगरयादव ओबीसी मतदारांवर प्रभाव आहे. या युतीचा समाजवादी पक्षाला काही प्रमाणात फायदाही झाला होता. या निवडणुकीत समाजवादी पार्टीचा १११ जागांवर विजय झाला होता.
हेही वाचा >>> विरोधक एकत्र येऊ नयेत यासाठीच भाजपाने अफवा पसरवली; डीएमके-जेडीयूचा आरोप
लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना सोबत घेत ८० जागा लढवणार
दरम्यान, याच कारणामुळे सपाने मोठ्या पक्षांशी युती न करण्याची भूमिका घेतली, असे म्हटले जात आहे. आमचा पक्ष २०२२ साली विधानसभा निवडणुकीसाठी स्वीकारलेल्या धोरणाचाच २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवलंब करणार असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले आहे. आपल्या मित्रपक्षांना सोबत घेत ते लोकसभेच्या ८० जागा लढवणार आहेत.