जोधपूर शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बसनी बेदान गावातील रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. गावात नळ बसवल्यानंतर दशकभराची पाण्याची तहान संपेल, असे गावकऱ्यांना वाटत होते. पण हा आनंद अल्पकाळ टिकला. नळांमधून बाहेर पडले ते पाणी नव्हते, तर फक्त हवा होती. या गावकऱ्यांनी आता २६ एप्रिल रोजी जोधपूर मतदारसंघासाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतदानादरम्यान आपली मागणी स्पष्ट केली. पाणी द्या आणि मत घ्या, असंच थेट गावकऱ्यांनी सांगून टाकलं आहे. पाइपलाइन टाकल्या, नळ बसवले, पण पाणी नाही, जवळपास दहा वर्षे झाली. इथली परिस्थिती जराही बदललेली नाही. आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते,” असे रहिवासी मंगला राम सांगतात. पाणी टंचाईचा मुद्दा कोणीही गांभीर्याने घेत नाही. राजकारणी खोटी आश्वासने देतात आणि मग ते सर्व विसरतात,” असे जोधपूर जिल्ह्यातील दुसऱ्या गावात राहणाऱ्या सुशीला सांगतात. त्या पुढे म्हणाल्या की, पाणीपुरवठा हा एकमेव मुद्दा आहे, जो गावातील लोक राजकीय नेते प्रचारासाठी भेट देऊन उपस्थित करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा