लोकसत्‍ता विशेष प्रतिनिधी

अमरावती : पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीत विधानसभेच्‍या ३० जागांपैकी तब्‍बल १५ जागी विजय मिळवणाऱ्या भाजपमध्‍ये इतर पक्षांतील नेत्‍यांचा ओघ वाढला असला, तरी अकोल्‍यात गंभीर गुन्‍ह्याची नोंद असलेल्‍या एका गुंडाच्‍या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आता राजकीय समीकरणांची पुन्हा नव्याने मांडणी होऊ लागली आहे. याचाच एक भाग म्हणून आता बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून आपली भूमिका नेहमी लवचिक ठेवणारे राजकारणी सावध झाले आहेत. भाजपमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी अनेक नेते इच्‍छुक आहेत. आपल्‍या सोयीच्‍या राजकारणात भाजपच्‍या प्रस्‍थापित नेत्‍यांनी इतर पक्षांतील नेत्‍यांसाठी पायघड्या अंथरल्‍या असल्‍या, तरी अकोला येथील एक पक्षप्रवेश चांगलाच गाजत आहे.

हेही वाचा – पुणे आणि चंद्रपूरमध्ये पोटनिवडणुका होणार की नाही?

अकोल्‍यातील भाजप कार्यालयात अजय ऊर्फ अज्‍जू ठाकूर याचा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत नुकताच प्रवेश झाला. अज्‍जू ठाकूर हा अकोल्‍यातील कुख्‍यात गुंड म्‍हणून ओळखला जातो. अज्‍जू ठाकूर याच्‍या नावावर अनेक पोलीस ठाण्‍यांमध्‍ये मारहाण, हत्‍येचा प्रयत्‍न, खंडणीसह अनेक गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. एका गुंडाचा भाजपप्रवेश झाल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. अकोला जिल्‍ह्यात सातत्‍याने राजकारणात वर्चस्‍व ठेवून असलेल्‍या भाजपला अशा व्‍यक्‍तींची गरज का भासावी, हा प्रश्‍न आता चर्चेत आला आहे. गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीच्‍या लोकांना भाजपमध्‍ये स्‍थान नसल्‍याचा दावा भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांकडून केला जात असला, तरी प्रत्‍यक्षात मात्र गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेले अनेकजण यापूर्वीही रितसर प्रवेशकर्ते झाले आहेत.

विधानसभेच्‍या २०१४ मध्‍ये झालेल्‍या निवडणुकीत पश्चिम विदर्भात भाजपने १८ जागा जिंकल्‍या होत्‍या. गेल्‍या निवडणुकीत ही संख्‍या कमी झाली, पण भाजपने वर्चस्‍व टिकवून ठेवले आहे. भाजपने यावेळी हिंदुत्‍ववादी भूमिका अधिक कठोर करीत पक्षविस्‍तारासाठी मोहीम उघडली आहे. काही वर्षांपूर्वी भाजपने पक्ष विस्‍तारक योजना हाती घेतली. बुथ कार्यकर्त्‍यांपर्यंत पोहोचणे हा हेतू त्‍यात होता. आता भाजपने विधानसभा मतदारसंघनिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरून जेवणाचा डबा (टिफिन) आणायचा आणि उच्चपदस्थ नेत्यांसमवेत एकत्र जेवण करीत संवाद साधायचा, असे या पार्टीचे स्वरूप आहे. या बैठकांमधून मोदी सरकारच्‍या नऊ वर्षांतील कामगिरीवर चर्चा अपेक्षित आहे. पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी अशा बैठकांचे आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यकर्ता आणि पक्षातील नेता, यामध्ये कुठलेही अंतर राहणार नाही, यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पण, यात थेट गुंडाचा पक्षप्रवेश अपेक्षित नव्‍हता, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.

हेही वाचा – ‘राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द, सत्तेसाठी या तीन गोष्टी महत्त्वाच्या’, राजीव गांधींना अरुण नेहरुंनी दिलेला सल्ला

या प्रकाराने विरोधी पक्षांच्‍या हाती आयते कोलित मिळाले आहे. भाजप ‘वॉशिंग मशिन’ असल्‍याचा आरोप आधीच विरोधकांकडून केला जातो. कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांनी त्‍यावर जोरदार टीका केली आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकीयीकरण हा अलीकडील काळात ट्रेंड बनल्‍याचे म्‍हटले जाते. आता भाजपचे नेते या घडामोडींचे समर्थन कसे करणार, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

अजय ऊर्फ अज्‍जू ठाकूर याची गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी आपल्‍याला ठाऊक नव्‍हती. अज्‍जू ठाकूर हा इतर ४० ते ५० लोकांच्‍या पक्षप्रवेशाच्‍या वेळी उपस्थित होता. पक्ष कार्यालयात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे स्‍वागतच केले जाते. भाजपने अज्‍जू ठाकूर याच्‍या पत्‍नीला पक्षात प्रवेश दिला आहे. त्‍याला अजून प्राथमिक सदस्‍यही केलेले नाही. प्रसार माध्‍यमांवरील चर्चेनंतर आपण त्‍याच्‍याविषयी अधिक माहिती घेत आहोत. त्‍यात तथ्‍य आढळून आल्‍यास, यावर निर्णय घेतला जाईल. पक्षात गुन्‍हेगारी वृत्‍तीला स्‍थान नाही. – रणधीर सावरकर, आमदार, भाजप.

Story img Loader