नागपूर: राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने प्रत्येक नागपूरकरांना त्याचा सार्थ अभिमान. ते नागपुरात आले की त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी होणारी गर्दी यातून याची प्रचिती येते. मात्र कधी -कधी एखाद्या व्यक्तीवरचे प्रेम व्यक्त करताना ते ऊतू गेल्यास त्याचे चटके संबंधित व्यक्तीला सहन करावे लागते. सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या नेतृत्वाला याचाच अनुभव येत आहे. यासाठी कारणीभूत ठरले ते दोन नागपूरकर. त्यानी केलेल्या विधानांमुळे ऐन अधिवेशन काळात सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.यातील पहिले नागपूरकर आहेत प्रशांत कोरटकर आणि दुसरे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी. वरील दोघांनी प्रथम वादग्रस्त वक्तव्य करून नंतर ते अंगलट येतोय हे लक्षात येताच त्यापासून हात झटकले. मात्र यामुळे सरकारची जी शोभा व्हायची ती झालीच. खुद्द मुख्यमंत्र्यांना खुलासा करावा लागला. यातच सर्व काही आले. मात्र या सर्व प्रकरणातील वेळ,बारकावे लक्षात घेतले तर अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यापैकी एक प्रश्न पडतो तो हा की, सर्व प्रकार ‘ तू मारल्या सारखं कर…’ या घाटीतील तर नाही ना?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा