जम्मू :भारत हा देश विविधतेतील एकतेसाठी ओळखला जातो आणि सरकारने प्रत्येक धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. मुस्लीम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी दिली जाणारी दोन तासांची सवलत आसाम विधानसभा रद्द करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अब्दुल्ला बोलत होते.

कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते आणि वेळ आल्यावर गोष्टी बदलतील, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. हा देश विविधतेत एकतेसाठी ओळखला जातो. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि म्हणूनच प्रत्येक धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे अब्दुल्ला म्हणाले.

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha election 2024 devyani farande vs vasant gite nashik central assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीय, धार्मिक मुद्दे निर्णायक
cultural and educational rights under indian constitution article 29 and 30
संविधानभान : भाषेचा मायाळू विसावा
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार

हेही वाचा : जरांगेंचा भाजपवरच राग का? शिंदे, अजित पवारांवर टीकेची तीव्रता कमी

भाजपच्या दोन नेत्यांची सोडचिठ्ठी

जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भाजपच्या आणखी दोन नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच तिकीट वाटपावरून भाजपला नाराजीचा सामना करावा लागत आहे, पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जम्मू प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली. पक्षासाठी अनेक दशके काम करणाऱ्याला तिकीट न देता नॅशनल कॉन्फरन्समधून भाजपमध्ये आलेल्याला उमेदवारी देण्यात आली, असा आरोप करून भाजपचे सांबा जिल्हाध्यक्ष काश्मीर सिंह यांनी राजीनामा दिला.

हेही वाचा : RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत

राहुल गांधींच्या बुधवारी दोन सभा

अनंतनाग : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवार, ४ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये दोन प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधी काश्मीरमध्ये येत आहेत. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील डोरू येथून विधानसभा निवडणूक लढवत असलेले गुलाम अहमद मीर म्हणाले की, गांधी डोरू स्टेडियममध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करतील. जम्मूच्या सांगलदान भागात आणखी एका सभेला ते संबोधित करतील, असेही मीर यांनी सांगितले.