सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या कोलकात्याच्या एसएसकेएम हॉस्पिटलचा वूडबर्न ब्लॉक सध्या तुरुंगवासापासून काही पावले दूर असलेल्या राजकारण्यांच्या आरामचे केंद्र बनले आहे. इथल्या खोल्यांमध्ये फ्रिज, एलईडी टीव्हीची सोय असून या अनेक सुविधा देणाऱ्या रुग्णालयात रुग्णांच्या मोठाल्या रांगा आणि घाईत असलेला कर्मचारी वर्ग नित्याची बाब आहे.
मागील काही वर्षांपासून सत्ताधारी तृणमूल कॉँग्रेसचे गुन्ह्यांसंबंधी फेऱ्यात अडकलेले बरेच सदस्य इथे डेरेदाखल होत असल्याचे चित्र आहे. २०१५ मध्ये शारदा चिट फंड घोटाळ्यासाठी सहा महिने अटकेत असलेले वाहतूक मंत्री मदन मित्रा यांचा जवळपास पाच महिने इथे मुक्काम होता. २०२१ दरम्यत नारदा केससाठी अटकेत असलेले दिवंगत पंचायत मंत्री सुब्रत मुखर्जी आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी इथेच दाखल झाले. शिक्षक नियुक्ती प्रकरणात अटक झालेले माजी मंत्री पार्थ चटर्जी हे “आजारपणाचा बनाव” रचून एसएसकेएममध्ये दाखल झाल्याचा दावा २४ जुलै रोजी ईडीने कलकत्ता उच्च न्यायालयात केला होता. चटर्जी यांची तपासणी एम्स भुवनेश्वरमध्ये करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे तपासणी करून घेतल्यानंतर चटर्जी यांना रुग्णालय भरतीची आवश्यकता नसल्याचा खुलासा एम्सने केला आणि या तृणमूल कॉँग्रेसच्या या माजी मंत्र्याला अटक करण्यात आली.
वूडबर्न ब्लॉकमध्ये एकूण ३५ खोल्या असून त्यांचे तीन भागांत वर्गीकरण करता येईल – इथे सर्वाधिक महागडी खोली दिवसाला रु ४००० इतक्या वाजवी दरात उपलब्ध असून उर्वरीत खोल्या रू. २००० किंवा रू. २५०० मध्ये उपलब्ध आहेत. इथे २४ तासांना रू. ७५० दरात परिचारक उपलब्ध असतात. मुरशिदाबादच्या रहिवासी मरझुअना बीबी रुग्णालयात ऑरथोपेडीक विभागातील बेडसाठी ताटकळत आहेत. राजकारण्यांनी एसएसकेएमच्या खोल्या अडवल्या आहेत. सांगतात, या प्रकरणी कितीतरी मीम्स व्हायरल होत असून एकामध्ये टीएमसी नेत्यांकरिता हे रुग्णालय म्हणजे “घरापासून दूर असलेला निवारा” असा आशय पाहायला मिळाल्याचे सांगितले.
“मी तीन दिवसांपासून बेड मिळवण्यासाठी खटपट करतेय. माझ्या आईवर वॉर्डबाहेर उपचार सुरू आहेत. बेड रिकामी झाल्याशिवाय काही करता येणार नाही,” असे मरझुअना सांगतात. भाजपा अध्यक्ष सुकान्ता मजुमदार सांगतात: “हे नेते एसएसकेएममध्ये राज्याचे आदरातिथ्य झोडपत आहेत. सरकारी रुग्णालयात दबावतंत्र वापरून मनासारखे वैद्यकीय अहवाल मिळवणे सोपे आहे. ”इथले डॉक्टर नक्कीच राजकारणी नेत्यांच्या दबावाखाली आहेत. जर उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून विनंती येत असेल तर डॉक्टरांचाही नाईलाज होतो, असे असोसिएशन ऑफ हेल्थ सर्विस डॉक्टरचे सचिव डॉ. मानस गुमटा यांनी सांगितले.