हर्षद कशाळकर

अलिबाग: ऐन थंडीच्या मोसमात रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर चढला असून सर्वच राजकीय पक्षांची यानिमित्ताने मोठी कसोटी लागणार आहे. या टप्प्यात २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस

१८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपले नशीब अजमावताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सरपंचपदाच्या २४० जागांसाठी ९०१ अर्ज दाखल झाले. तर १९४० सदस्य पदांसाठी ४३८२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापबरोबरच नव्याने निर्माण झालेली बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटदेखील पहिल्यांदाच सर्व ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

हेही वाचा: विरोधकांच्या गनिमी काव्यामुळे भाजपपुढे तहाची वेळ

सर्वच राजकीय पक्षांचे छोटे छोटे युनिट प्रत्येक गावात पाहायला मिळतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकाच राजकीय पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवताना अनेक राजकीय अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे या वेळी स्वबळावर निवडणुका लढवण्याऐवजी युती आघाड्यांची समीकरणे जुळवताना पाहायला मिळत आहेत. मात्र ही समीकरणे जुळवताना वरिष्ठांच्या नाकीनऊ येत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हे यामागचे प्रमुख कारण ठरते आहे.

हेही वाचा: शिंदे सेना -भाजपा युतीने लातूरमध्ये लाभापेक्षा तापच अधिक

शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी एकत्र येत बऱ्याच गावांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना दिसत आहेत. तर शिंदे गट स्वतंत्रपणे आपली ताकद अजमावत आहे. शेकापने अलिबाग तालुक्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत घरोबा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; परंतु त्याला अपेक्षित यश येताना दिसत नाही. त्यामुळे नेतेमंडळींना कसरत करावी लागते आहे. सरपंच किंवा सदस्यपदासाठी एकापेक्षा अधिक इच्छुक पुढे आल्याने अडचण झाली आहे.

Story img Loader