सचिन पाटील

जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. ऐन दिवाळीच्या सुमारास निवडणुका लागल्याने यामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी व मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार “लक्ष्मी” दर्शन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पैकी काही ग्रामपंचायती या आर्थिकदृष्ट्या संपन्न असून काही जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या घरच्या अंगणात होणार आहेत. त्यामुळे घरातील ग्रामपंचायतीत विजय मिळविणे जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेत्यांच्या इभ्रतीचा प्रश्न ठरणार आहे.

Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
house Ravet , Ravet Pradhan Mantri Awas,
पिंपरी : घरांची सर्वाधिक मागणी असलेल्या रावेतमधील ‘पंतप्रधान आवास’चा गृहप्रकल्प रद्द; नेमके कारण काय?
MLA Randhir Savarkar appointed as BJPs chief spokesperson in legislature
अकोला : मंत्रिपदाची संधी हुकली, मात्र पक्षाने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
The proportion of supplementary demands compared to the budget is 20 percent
अर्थसंकल्पाच्या तुलनेत पुरवणी मागण्यांचे प्रमाण २० टक्क्यांवर; यंदाच्या वर्षात १ लाख ३० हजार कोटींच्या मागण्या
mahayuti government cabine expansion Vidarbha, Ministerships
विदर्भातील सात जिल्हे मंत्रिपदापासून वंचित, काही जिल्ह्याला तीन तर काहींना एकही नाही, असंतुलित वाटपाने नाराजी
Pedestrian, Pedestrian Day Pune, Pune,
पुणे : पादचारी दिनासाठी शहरातील इतक्या चौकांमध्ये फक्त रंगरंगोटीच !
Kalyan, Ward level approval, plots Kalyan,
कल्याण : दिडशे ते तीनशे मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामांना प्रभागस्तरावर मंजुरी

पालघर जिल्हयातील मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायती आणि विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ४९ ग्रामपंचायतीमधील ८९ जागांसाठी ५ नोव्हेंबरला मतदात पार पडणार आहेत. यामध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश असून मतदानाद्वारे थेट सरपंच पदाची निवड होणार आहे. पालघर तालुक्यातील माहीम, सरावली, खैरापाडा, सालवड, डहाणू तालुक्यातील चिंचणी, बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील उधवा, कवाडा सारख्या ग्रामपंचातींच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो यांवर सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचा… पुणे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, आमदार धंगेकर यांना डावलले

तारापुर औद्योगिक क्षेत्रात येत असलेल्या सरावली, खैरापाडा आणि सालवड ग्रामपंचायत क्षेत्रात एमआयडीसीमुळे प्रचंड नागरीकरण झाले असून या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जातात. मात्र प्रचंड नागरीकरणामुळे प्रदूषणासोबत इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सरावली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असून स्थानिकांसोबतच परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. शिवसेना पक्षात फुट पडल्यामुळे इथली निवडणूक चुरशीची होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रभाकर राऊळ आणि जगदीश धोडी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा व शिवसेनेच्या जिल्हा महीला संघटक वैदेही वाढाण यांच्यासाठी सालवड ग्रामपंचायतीत विजय मिळविणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पालघर ला लागून असलेल्या माहीम ग्रामपंचायत क्षेत्रात देखील वेगाने शहरीकरण होत असून माजी जिल्हाप्रमुख आणि शिवसेना उपनेते राजेश शहा यांच्यासाठी घरच्या मैदानावर ग्रामपंचायतीत सत्ता राखणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे.

हेही वाचा… २०१८ च्या पराभवातून धडा घेत भाजपाने बदलली रणनीती; पंतप्रधान मोदी यांच्याऐवजी पक्ष संघटनेवर भर

डहाणू तालुक्यातील चिंचणी आणि बोर्डी या मोठ्या ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची असून भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी नव्याने नियुक्ती झालेल्या भरत राजपूत यांच्या नेतृत्वात भाजप कशी कामगिरी करतो यांवर पूढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित लागणार आहे. तर तलासरी तालुक्यातील कवाडा ही ग्रामपंचायत आमदार श्रीनिवास वनगा यांच्या घरच्या मैदानावर होत असून या ठिकाणी कायम माकप चे वर्चस्व राहीले आहे. त्यामुळे यावेळी घरातली निवडणूक जिंकणे आमदार वनगा यांच्यासाठी देखील महत्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा… छत्तीसगड विधानसभा निवडणूक : भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, केंद्रातील नेत्यांना तिकीट!

शिवसेना पक्षफुटीनंतर मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चांगले यश मिळवले होते तर शिंदे गटाचा मात्र पुरता धुव्वा उडाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट झाल्याने त्यांची कामगिरी कशी राहते यांवर लक्ष असणार आहे. तर डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी माकप आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच रंगणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहीला असून या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायत निवडणुकांकडे पाहीले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्व पक्ष पूर्ण तयारीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता असून यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे.

Story img Loader