उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात भाजपचे चारही जिल्ह्यांत वाढणारे बळ अधोरेखीत झाले आहे. शिंदे गटानेही आश्चर्यकारक मुसंडी मारली आहे. विरोधकांमध्ये राष्ट्रवादीने ग्रामीण भागातील आपली पाळेमुळे अधिक मजबूत केली असली तरी यापुढे भाजप-शिंदे गटाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांना महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे.

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्याने प्रत्येक पक्षाकडून सर्वाधिक जागा मिळविल्याचे दावे केले जातात. वे अ नाशिक जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी सरपंच पदाच्या सर्वाधिक ६३ जागा जिंकून ग्रामीण भागात आपला वरचष्मा कायम राखला. त्या खालोखाल भाजप समर्थकांनी ५५ जागांवर विजय मिळवत ग्रामीण भागात बळ वाढविले.

Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

हेही वाचा: Mahrashtra Assembly Session: “तुम्ही मान खाली घालून गप्प आहात,” भास्कर जाधवांचा संताप; फडणवीस म्हणाले “कोणाच्या बापामध्ये इतकी…”

ठाकरे गटाला २८ तर, शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या. काँग्रेस पुन्हा एकदा तळाला राहिली. त्यांना केवळ सात जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात राष्ट्रवादीच्या या तीनही आमदारांच्या क्षेत्रात त्यांना भाजप किंवा शिंदे गटाकडून नव्हे तर, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून धक्का बसला आहे. बनकर यांच्या गावात पिंपळगाव बसवंतमध्ये ठाकरे गटाचे भास्करराव बनकर यांनी बाजी मारली. कोकाटे यांच्या सिन्नर मतदार – संघातही ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी वर्चस्व राखले. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही ठाकरे गटाने आपली ताकद दाखवली असून भुजबळ यांनीही राष्ट्रवादीनेच अधिक जागा मिळविल्याचा दावा केला आहे.

भाजपने देवळा, चांदवड मतदारसंघात तर, राष्ट्रवादीने बागलाण, कळवणमध्ये आपला प्रभाव कायम राखला. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, पालकमंत्री दादा भुसे यांनीही नांदगाव, मालेगाव बाह्य या आपल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. एकूणच बंडखोरीनंतरही ठाकरे गट जिल्ह्यात अजूनही बऱ्यापैकी टिकून असल्याचे दिसून येते. जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाकडून वर्चस्वाचा दावा करण्यात आला आहे. दूध संघात पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचे राजकारण संपल्याची हाकाटी पिटण्यात आली.

हेही वाचा: पूजा मानमोडे : समाजकारणातून राजकारणात

परंतु, मुक्ताईनगर या आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद खडसे यांनी कायम राखल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालातून दिसून आले. दूध संघात खडसे यांच्या पत्नीचा पराभव करणारे भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरात काही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. परंतु, खडसे यांचा प्रभाव कायम राहिला. शिंदे गटातील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्वही टिकून आहे. धुळे जिल्ह्यात भाजप अधिकाधिक मजबूत होत असून धुळे तालुका वगळता इतरत्र विरोधकांच्या हाती फारसे काही लागले नाही. शिरपूर तालुक्यातील सर्व जागा भाजप समर्थकांनी मिळविल्याने आमदार अमरीश पटेल यांची ताकद पुन्हा एकदा सिध्द झाली.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्ह्यात कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून राजकीय मशागत

नंदुरबार जिल्ह्यात सर्वच पक्षांनी आपणास अधिक जागा मिळाल्याचा दावा केल्याने नेमकी राजकीय परिस्थिती समजणे अवघड झाले आहे.
या निकालांनी प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना पुढील रणनीतीत काय बदल करावा लागेल, हे दाखवून दिले आहे. ठाकरे गटाला धुळे, जळगाव जिल्ह्यात अधिक काम करावे लागणार आहे. काँग्रेसला केवळ धुळे तालुक्याने साथ दिली आहे. राष्ट्रवादीला नाशिक आणि काही प्रमाणात जळगाव जिल्ह्याने साथ दिली आहे.