ठाणे : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यातून पीछेहाट होत असताना महायुतीला कोकणपट्टीत मात्र चांगले यश मिळाले. या यशाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीतही होईल असा दावा एकीकडे महायुतीचे नेते करत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यातील वाढती धूसफुस सध्या कोकणपट्टीत चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून माणगावपर्यंतच्या रस्त्यांची भर पावसात पहाणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रविंद्र चव्हाण यांची अनुपस्थिती सध्या भाजपमधील अस्वस्थतेचे मोठे कारण ठरु लागले आहे. मालवण येथील पुतळा दुर्घटनेमुळे चव्हाण यांनी पनवेलमधूनच हा दौरा आटोपता घेतल्याची सारवासावर यानिमित्ताने केली जात असली तरी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची कोणतीही पुर्वसूचना चव्हाणांना नव्हती अशी चर्चा आता दबक्या सुरात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याची कल्पना येताच सोमवारी घाईघाईने पनवेलच्या शासकीय विश्रामगृहात पोहचलेल्या चव्हाणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचेही बोलले जात आहे.

कोकणात रविंद्र चव्हाण यांचा वाढता वावर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना खटकू लागला आहे. कोकणपट्टीतील शिंदे यांच्या पक्षातील बडे नेते आणि खेड विधानसभेत वरचष्मा राखणारे रामदास कदम आणि चव्हाण यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांकडून हिसकावून घेत भाजपने येथून नारायण राणे यांना रिंगणात उतरविले. विजयानंतर राणे यांच्या गोटातून उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य केली जात आहेत. या वादात चव्हाण हेच शिंदेसेनेतील नेत्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण ठरत असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे भाजपचे स्थानिक नेते फिरकले नाहीत. त्यामुळे या दोन पक्षातील दरी आणखी वाढत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पहाणी दौऱ्यानिमीत्त चव्हाण आणि शिंदेसेनेतील बेबनावाच्या नव्या कथा पुढे येऊ लागल्या आहेत.

bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Tanaji Sawant vs NCP
NCP vs Tanaji Sawant: ‘आता सत्तेतून बाहेर पडलेलं बरं’, विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाचा इशारा
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Ajit Pawar, Maratha reservation, Marathwada, NCP, Lok Sabha elections, Muslim community, Ramgiri Maharaj, protest, Vasmat, Ahmedpur, ncp
अजित पवार यांना मराठवाड्यात विरोध; मराठा, मुस्लीम समाजांच्या नाराजीचा फटका
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा…अजित पवार यांना मराठवाड्यात विरोध; मराठा, मुस्लीम समाजांच्या नाराजीचा फटका

चव्हाणांना निमंत्रण नव्हते का ?

गणेशोत्सवाचा हंगाम जवळ आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांची पहाणी केली. पनवेललगत असलेल्या पळस्पेपासून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. गडब, वाकण, कोलाड, माणगाव येथे भर पावसात उतरुन त्यांनी रस्त्यांच्या कामाची पहाणी केली. यानंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याचीही त्यांनी पहाणी केली. कोकणच्या दिशेने जाणारा हा पट्टा नेहमीच खड्डयात असल्याने कोकणवासियांसाठी पळस्पे ते कशेडी बोगद्यापर्यतचा प्रवास नेहमीच जिकरीचा असतो. त्यामुळे या रस्त्याच्या पहाणीसाठी मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यातील हा महत्वाचा मार्ग निवडला खरा मात्र या संपूर्ण दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असूनही रविंद्र चव्हाण यांना फारसे प्राधान्य दिले नसल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या या नियोजीत दौऱ्याचे कोणतीही र्वकल्पना चव्हाणांना देण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी या मार्गावरील रस्त्यांच्या पहाणीसाठी चव्हाण यांनी अनेकदा दौरे केले होते. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होण्याची सूचना नसतानाही चव्हाण यांनी रविवारी रात्री तातडीने पनवेल येथे निघण्याचे ठरविले. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चव्हाण पनवेल येथे पोहचले आणि येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे समजते. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रवेशव्दारावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा ताफा घेऊन चव्हाण हजर राहीले खरे मात्र मालवणात पुतळा दुर्घटनेचे कारण देत ते दौरा अर्धवट सोडून मालवणच्या दिशेने निघाल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

भाजपचे नेते उपस्थित

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. याशिवाय पेणचे भाजप आमदार रविंद्र पाटील आणि पनवेलचे प्रशांत ठाकूर यांनीही काही काळ या दौऱ्यात उपस्थिती दाखवली होती. असे असले तरी भाजप नेत्यांपेक्षा शिंदेसेनेच्या आमदारांनी या दौऱ्यासाठी घेतलेला पुढाकार चर्चाचा विषय ठरला होता.

हेही वाचा…जालन्यात अजित पवार गट आग्रही

राजशिष्टाचाराप्रमाणे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी रायगडला गेलो होतो. अधिकाऱ्यांबरोबर बैठक सुरू असताना मालवण येथील पुतळ्याची घटना घडली. त्यामुळे तेथे तातडीने जावे लागले. बाकी शिवसेना-भाजपमध्ये कोणतेही वितुष्ट नाही. आम्ही एकदिलाने काम करतो. – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री.