ठाणे : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यातून पीछेहाट होत असताना महायुतीला कोकणपट्टीत मात्र चांगले यश मिळाले. या यशाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीतही होईल असा दावा एकीकडे महायुतीचे नेते करत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यातील वाढती धूसफुस सध्या कोकणपट्टीत चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून माणगावपर्यंतच्या रस्त्यांची भर पावसात पहाणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रविंद्र चव्हाण यांची अनुपस्थिती सध्या भाजपमधील अस्वस्थतेचे मोठे कारण ठरु लागले आहे. मालवण येथील पुतळा दुर्घटनेमुळे चव्हाण यांनी पनवेलमधूनच हा दौरा आटोपता घेतल्याची सारवासावर यानिमित्ताने केली जात असली तरी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची कोणतीही पुर्वसूचना चव्हाणांना नव्हती अशी चर्चा आता दबक्या सुरात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याची कल्पना येताच सोमवारी घाईघाईने पनवेलच्या शासकीय विश्रामगृहात पोहचलेल्या चव्हाणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचेही बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा