लातूर : राजकारणात बदलाचा झपाटा कमालीचा वेगवान असतो. पालकमंत्र्यांची निवड झाली आणि लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाचे मित्रमंडळही स्थापन झाले. तसा राजकीय संपर्क नसणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांची मित्रमंडळीची संख्या लातूरमध्ये अचानक वाढली. प्रजासत्ताक दिनी ते ध्वजारोहणाच्या सोहळ्याला येतील तेव्हा त्यांना त्यांचे नवे मित्रमंडळ दिसेल.

शहरातील औसा रस्त्यावरील नंदी स्टॉप येथील रस्त्यावरील विजेच्या खांबाला मित्र मंडळाचा फलक झळकला त्यावर पालकमंत्र्याचा फोटो व स्वागतोत्सुक म्हणून आठ-दहा अनोळखी तरुणांचे फोटो झळकत होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारचे, यापूर्वी ते लातूर कधी तरी व्यक्तिगत गाठीभेटी आले असतील. पण सार्वजिक जीवनात त्यांचा वावर नव्हताच. आता त्यांच्या नावाच्या मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली. कधी आणि कशी ही प्रक्रिया घडली याची चर्चा लातूरमध्ये सध्या रंगते आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांना शुभेच्छा दिल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागातील छोटी ,मोठी कंत्राटे घेता येतील असा फलकावरील मित्रमंडळीचा होरा असल्याचे सांगण्यात येते.

Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांवरच बलात्काराचा गुन्हा, पक्षासमोरील अडचणी वाढल्या; हरियाणात राजकीय घडामोडींना वेग
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

शासकीय कामे मिळवायचे असतील तर कोणीतरी आपल्या जवळचा असावा लागतो, जवळीक असेल तर कामे होतात हा प्रघात असल्यामुळे मित्र मंडळाच्या नावाने स्वागताचा फलक लावण्यात आले. शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे मंत्री ,शहरात शुक्रवारी सकाळपर्यंत भाजपच्या स्थानिक एका पदाधिकाऱ्यांचे फलक झळकले त्या व्यतिरिक्त कोणीही स्वागताचे फलक लावले नाहीत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळी शहरातील विजेच्या खांबाला लावलेल्या फलकाची काढणी सुरू केली व त्यात मित्र मंडळाचा हा फलक काढण्यात आला . अहमदपूरचे आ. व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जिल्ह्यातील अनुभवी नेते मात्र त्यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे कारण जिल्ह्यात तीन आमदार भाजपचे तर दोन आमदार अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीचे आहेत.त्यामुळे पालकमंत्री पद भाजपला देणे क्रमप्राप्त असल्याने बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचे पालकमंत्री पद स्वीकारावे लागले. आता शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री झाल्यानंतर राजकारणात काही नवे चेहरे उतरु पाहत आहेत.

Story img Loader