विधानसभा निवडणुकीमुळे गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहेत. भाजपा, काँग्रेसारख्या पक्षांनी या निवडणुकीत अनेक स्टार चेहरे प्रचारासाठी उतवरले आहेत. दरम्यान यावेळी आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षानेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. याच कारणामुळे येथील निवडणुका यावर्षी चांगल्याच रंजक ठरत आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधील नरोडा या मतदारसंघाची खास चर्चा होत आहे. या मतदारसंघामध्ये आप आपले स्थान निर्माण करताना दिसतोय. तर दुसरीकडे मागील तीन दशकांपासून या जेगवर फक्त भाजपाचाच उमेदवार निवडून आलेला आहे.

हेही वाचा >>>> Gujarat Election : खांबालियामध्ये १९७२ पासून एकाच समाजाचा आमदार, ‘आप’चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावेळी रेकॉर्ड तोडणार?

नरोडा या मतदारसंघाला दंगलीची झळ बसलेली आहे. २००२ साली झालेल्या धार्मिक दंगलीत शेकडो लोकांचा येथे मृत्यू झालेला आहे. याच कारणामुळे या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असते. हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागील तीन दशकांपासून या जागेवर फक्त भाजपाचाच उमेदवार निवडून आलेला आहे. यावेळी भाजपाने येथून गुजरात दंगलीत दोषी ठरलेल्या मनोज कुलकर्णी यांच्या मुलीला म्हणजेच पायल कुलकर्णी यांना उमेदवारी दिलेली आहे.

Gujarat Election: गुजरातमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा झंझावाती प्रचार, विरोधक टीका करत म्हणाले, “देवाच्या भरवश्यावर राज्य सोडून…”

तर दुसरीकडे आप पक्षाने भाजपाचा सामना करण्यासाठी येथे ओमप्रकार तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. ओमप्रकाश तिवारी हे मूळचे वाराणसी येथील आहेत. दरम्यान, भाजपाने पायल कुलकर्णी यांना उमेदवारी दिल्यानंतर आप पक्षाकडून विकास या मुद्द्यावर येथील निवडणूक लढवली जात आहे. दंगलीच्या आठवणी विसरून जाऊन विकास या मुद्द्यावर आपण मतदान करावे, असे आवाहन आप पक्षाकडून केले जात आहे. काही लोकांमध्येही तशीच भावना असून आप पक्षाच्या मोफत वीज, सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेली रुग्णालये, चांगल्या शाळा निर्माण करण्याच्या आश्वासनांकडे लोक आकर्षित होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>> तामिळनाडू सरकारने EWS आरक्षण नाकारलं; भाजपासह AIADMKचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

नरोडा या मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात येत्या ५ डिसेंबर रोजी मतदान होईल. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader