Gujarat Assembly Election 2022 : २०१५-१६ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा राहिलेले भाजपा नेते हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाव मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. वीरमगावला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन देत हार्दिक पटेल यांनी या वचननामा जाहीर केला आहे. तर भाजपा नेत्यांकडून हार्दिक पटेल यांची प्रशंसा केली जात असून, एक लढवय्या नेता असं त्यांना संबोधलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर हार्दिक पटेल यांनी वीरमागावमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, ही निवडणूक मी नाही लढत आहे तर वीरमगावची जनता लढत आहे. या सभेत त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अल्पेश ठाकोर केंद्रीयमंत्री महेंद्र मुंजापारा, राज्य भाजपा महासचिव प्रदीपसिंह वाघेला आणि वीरमगावचे माजी आमदार वजुभाई डोडिया, तेजश्रीबेन पटेल आणि प्रागजीभाई पटेल आदींसारखे पक्षाचे वरिष्ठ नेता सहभागी झाले होते. याशिवाय अनेक धर्मगुरुंचीही या सभेस उपस्थिती होती.

यावेळी हार्दिक पटेल म्हणाले, आज केवळ मीच नाही तर वीरमगाव विधानसभा मतदारसंघातील तीन लाख लोक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जात आहेत. आपण हा उमेदवारी अर्ज भाजपाचा उमेदवार जिंकावा किंवा विरोधी उमेदवार हरावा यासाठी नाही तर १० वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या वीरमगावच्या लोकांना जिंकण्यासाठी दाखल करत आहोत.

मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला –

हार्दिक पटेल यांनी या दरम्यान आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये त्यांनी एक आधुनिक क्रीडा संकुलाचे बांधकाम, अहमदाबादच्या कांकरिया तलावाच्या धर्तीवर ऐतिहासिक मुसर आणि गंगासर तलावांचा पुनर्विकास, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांची स्थापना, योग्य सीवरेज नेटवर्क तयार करण्याचे प्रस्तावित केले. याशिवाय त्यांनी म्हटले की ते १.२५ लाख रुपये मासिक वेतनाचा उपयोग पशु पाउंड, शिक्षण आणि मतदारसंघातील सामाजिक कार्यासाठी करतील.

याशिवाय आपल्या भाषणादरम्यान हार्दिक पटेल यांनी हेही सांगितले की, प्रसारमाध्यमांनी या जागेवरील लढत कठीण होणार असल्याचे म्हटले आहे. परंतु देव त्यांनाच अडचणी देतो ज्यांच्यामध्ये त्या अडचणींशी लढण्याची क्षमता असते. यानंतर अल्पेश ठाकूर यांनी हार्दिक पटेल यांना योद्धा असं संबोधलं, एका लोक नेत्याने अशाप्रकारे योद्धा असावं, जो लोकांच्या प्रश्नांना आवाज देऊ शकेल. त्यांनी तुमच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहायला हवं आणि म्हणूनच तुम्हाला हार्दिक पटेल यांच्याशिवाय चांगला अन्य उमदेवार मिळणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly election hardik patel who has left congress is contesting from veeramgaon bjp leader says fighting leader msr