क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपानं गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं आहे. त्यामुळे रिवाबा जडेजा या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय विश्वात पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे भाजपानं विद्यमान आमदाराला टाळून रिवाबाला निवडणुकीचं तिकीट दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी निवडणुकीत जामनगर उत्तर या मतदारसंघातून रिवाबा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जामनगर उत्तर हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ राहिला आहे. धर्मेंद्रसिंह जडेजा हे सध्या जामनगर उत्तर या मतदारसंघातून भाजपाचे आमदार आहेत. मात्र, विद्यमान आमदारांना नाकारून भाजपानं नवख्या रिवाबा जडेजा यांच्यावर भरवसा दाखवला आहे. त्यामुळे स्थानिक वर्तुळात भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचीही चर्चा रंगली आहे.

आता रिवाबा जडेजा या आपल्या प्रचारात व्यस्त झाल्या आहेत. शनिवारी जामनगर उत्तर मतदारसंघात त्यांनी पदयात्रा काढली होती. ही निवडणूक जिंकण्याचा त्यांना विश्वास आहे. मात्र त्यांच्यासमोर स्थानिकांच्या नाराजीचे मोठे आव्हान दिसत आहे. कारण अद्याप तरी मतदारसंघातील लोक त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणूनच मानत आहेत.

या निवडणुकीत रिवाबा यांच्या विरोधात काँग्रेसचे दिग्गज नेते बिपेंद्र सिंह जडेजा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराचे व्यवस्थापन हे रविंद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुख नैना जडेजा पाहत आहेत. याचबरोबर त्या रिवाबाच्या नणंद आणि चांगल्या मैत्रीणही आहेत. याशिवाय या मतदारसंघात आम आदमी पार्टीने करसन करमूर यांना उमेदवारी दिलेली आहे. करमूर हे अगोदर भाजपामध्ये होते, मागील वर्षीच त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता.

२०१७ मध्ये धर्मेंद्र जडेजांनी विक्रमी १४ हजार मतांनी निवडणूक जिंकली होती –

२०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाच्या धर्मेंद्रसिंह जडेजा (हकूबा) यांना ५९ टक्के मतं मिळाली होती आणि त्यांनी ही निवडणूक ४१ हजार अशा विक्रमी मताधिक्यांनी जिंकली होती. आता त्यांच्या जागी उमेदवारी रिवाबा यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांना जामनगर उत्तर आणि जामनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. रिवाबा यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांची कौटुंबिक संपत्ती ९७ कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly election rivaba jadeja who is new to politics will have to fight against experienced opponents msr
First published on: 21-11-2022 at 19:27 IST