काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतसिंह सोलंकी यांना कोविडची लागण झाल्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये तबब्ल १०० दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आशियात एखाद्या व्यक्तीने रुग्णालयात व्यतीत केलेला हा सर्वाधिक काळ असल्याचं प्रशासनानं सांगितलं. यानंतर भरतसिंह सोलंकी यांना आपल्यामागील मोठं विघ्न संपल्याचं वाटलं असावं. पण शुक्रवारी त्यांच्यासमोर एक नवी अडचण उभी राहिली.

भरतसिंह सोलंकी यांचा गेल्या अनेक काळापासून पत्नीसोबत वाद सुरु असून शुक्रवारी काही व्हिडीओ लीक झाल्याने हा वाद आणखीनच खालच्या पातळीवर गेला. यानंतर माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या भरतसिंह यांनी पत्रकार परिषद घेत आपण थोडे विचलित असून सार्वजनिक आयुष्यातून काही काळासाठी विश्रांती घेत असल्याचं जाहीर केलं.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

काँग्रेससमोर मात्र यामुळे मोठी अडचण निर्माण झाल्याचं दिसत आहे. हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्याचा धक्का अद्याप पचवता न आलेल्या काँग्रेससाठी या नव्या घडामोडीमुळे भाजपाविरोधातील लढाई अशक्य ठरत असल्याचं चित्र आहे.

६८ वर्षीय सोलंकी पक्षाचे दिवंगत नेते माधवसिंह सोलंकी यांचे पुत्र आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसच्या एकेकाळी अजिंक्य ठरलेल्या ‘खाम’ (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम) फॉर्म्यूलाचे ते जनक होते.

सोलंकी आणि त्यांच्या पत्नीमधील वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. दोघेही एकमेकांविरोधात स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नोटीस छापत आहेत. सोलंकी यांनी आपण आपल्या पत्नीसोबत सर्व संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच पत्नीकडून आपल्या नावाचा गैरवापर होण्यासंबंधी इशारा दिला होता. पत्नीनेही आपल्या वकिलाच्या मार्फत निवेदन जारी करताना सांगितलं होतं की, “जेव्हा सोलंकी यांनी करोनाची लागण झाली तेव्हा आपण त्यांची काळजी घेतली. पण त्यानंतर त्यांनी आपल्याशी गैरवर्तन सुरु केलं”.

पत्रकार परिषदेत सोलंकी म्हणाले की, “मी संबंध तोडलेल्या माझ्या पत्नीवर सार्वजनिक ठिकाणी कोणताही वैयक्तिक हल्ला करणार नाही. माझ्याविरोधात अनेक गोष्टी बोलण्यात आल्या असून स्पष्टता आणण्यासाठी मी आज येथे आलो आहे. माझ्या पत्नीविरोधात कायदेशीर लढाई सुरु असून जे काही पुरावे असतील ते मी कोर्टापुढे सादर करणार आहे”.

काही काळासाठी विश्रांती घेत असल्यासंबंधी बोलताना त्यांनी हा काळ एक किंवा सहा महिन्यांसाठी असू शकतो असं सांगितलं. पण आपण डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी परतणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “या काळात मी गुजरातमधील विविध समाजातील लोकांशी बोलून आणि त्यांना एकत्र करून पक्षाला पाठिंबा मिळवून देणार आहे”. यावेळी त्यांनी हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असून सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचं सांगितलं. तसंच पक्षाशी याचा काही संबंध नसून मी अद्यापही काँग्रेसचा भाग असल्याचंही म्हटलं.

सोलंकी यांचे वडील माधवसिंह हे तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. कोळी क्षत्रिय नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी खाम फॉर्म्यूला आणला होता ज्याच्या आधारे १९८५ मध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसने १८२ पैकी १४९ जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं.

मुख्यमंत्री असताना माधवसिंह यांनी ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केला ज्यामुळे गुजरातमधील इतर समुदायांमध्ये असंतोष निर्माण झाला. याविरोधात १९८५ मध्ये आरक्षणविरोधी दंगली झाल्या. नंतरच्या काळात हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखालील २०१५ पाटीदार आरक्षण आंदोलनदेखील पेटलं होतं.

भरतसिंह सोलंकी यांनी १९९२ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या ३० वर्षात त्यांनी काँग्रेस पक्षात अनेक पदं भूषवली. भरतसिंह तीन वेळा आमदार, दोन वेळा खासदार, दोन वेळा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष, राज्य युनिटचे तसंच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००९ ते २०१४ केंद्रीय मंत्री राहिले आहेत. केंद्रीय मंत्री असताना त्यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी होती.

२०१७ विधानसभा निवडणुकीत भरतसिंह सोलंकी यांनी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळवून दिलं होतं. काँग्रेसने ७७ जागा जिंकत गेल्या तीन दशकातील चांगली कामगिरी केली होती. काँग्रेसच्या विजयात सोलंकी यांनी पाटीदार समुदायाचा मिळवलेला पाठिंबा कारणीभूत ठरला होता.

मात्र त्यानंतर काँग्रेसची घसरण सुरू आहे. काँग्रेसने दोन ज्येष्ठ नेते गमावले असून १३ आमदारांनी साथ सोडली आहे. यावेळीही काँग्रेस आक्रमक भूमिकेत असणाऱ्या आम आदमी पक्षाशी लढत आहे.

गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोषी यांनी सांगितलं आहे की, सोलंकी सार्वजनिक आयुष्यातून एक पाऊल मागे घेत आहेत याचा अर्थ ते पक्षाशी संबंधित राहणार नाही असा होत नाही. “भरतभाई अद्यापही पक्षाचा महत्वाचा भाग असून गुजरातमधील जनतेसाठी आपलं काम सुरु ठेवणार आहेत. निवडणुकीपूर्वी नवीन आणि उत्साही सोलंकी पाहायला मिळतील, अशी आम्हाला आशा आहे,” असं मनिष दोषी म्हणाले आहेत.

आपल्याला शांत करण्यासाठी खासगी आयुष्यातील व्हिडीओ लीक करण्याचं हे राजकीय षडयंत्र असल्याच्या दाव्याशी सोलंकी सहमत आहेत. ते म्हणाले की, “गेल्या ३० वर्षांच्या माझ्या सार्वजनिक आयुष्यात मी काँग्रेस आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका निभावल्या. पदाचा गैरवापर, भ्रष्टाचार असे कोणतेही आरोप माझ्यावर झाले नसून माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. निवडणुकीच्या आधी ज्याप्रकारे हे आरोप समोर आले आहेत ते संशयास्पद आहे,” असं भरतसिंह म्हणाले आहेत.

“माझे आजोबा, वडील आणि मला गुजरातमधील दलित आणि वंचित समाजाकडून फार प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत. ओबीसी क्षत्रियांच्या अस्तित्वासाठी हा लढा आहे. त्यांना (शत्रू) वाटलं असेल की सोलंकीला बाजूला केल्यानंतर आपोआप हा लढा थांबेल. पण गुजरातमधील ओबीसी, ठाकूर, क्षत्रिय, आदिवासी किंवा मुस्लिम असो…बेरोजगारी, महागाई, इंधनाच्या वाढत्या किमती आदींबाबत लोकांमध्ये जागरुकता आहे. त्यामुळेच अशा सामान्य प्रश्नांवर या समाजांना एकत्र आणू शकणाऱ्या लोकांवर हल्ला होत आहे”, अशी टीका भरतसिंह यांनी केली आहे.

Story img Loader