गुजरात विधासनभा निवडणुकीसाठी आज ( ५ नोव्हेंबर ) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस आणि पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पक्षाने ( आप ) जोरदार प्रचार केला होता. तिन्ही पक्षाकडून मोठी आश्वासने गुजरातमधील जनतेला देण्यात आली. पण, गेली पंधरा वर्षे गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता असूनही नागरिकांना अद्यापही रस्ते, शिक्षण, महागाई या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.
जुहापुरा हे अहमदाबादच्या नजदीक असलेले एक गाव आहे. तेथे सुमारे पाच लाख मुस्लीम समुदायाची वस्ती आहे. ही भारतातील सर्वात मोठी मुस्लीम समुदायाची वस्ती असल्याचं सांगण्यात येतं. पण, येथील मुस्लीम समुदायाला अजूनही मुलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत असल्याचे नागरिकांनी म्हटलं.
हेही वाचा : गुजरात निवडणुकीत महिला मतदारांच्या टक्केवारीत घट; नक्की काय आहे कारण?
याबाबत राफिया मणियार यांनी सांगितलं की, “१९९० साली लग्न झाल्यानंतर अहमदाबादमधील वासना येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. पण, १९९० साली झालेल्या दंगलीमुळे त्यांना मुस्लीमबहुल असलेल्या जुहापुरा भागात राहण्यासाठी जावे लागले. २००२ साली झालेल्या दंगलीनंतर अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य राज्यातील मुस्लिमांनी येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.”
“२००२ च्या दंगलीनंतर लोक समजूतदार झाले आहेत. त्यांना माहिती दंगलीत निष्पाप लोकांचा बळी जातो, खरे गुन्हेगार दूर राहतात. त्यामुळे आता दंगल होण्याची शक्यता नाही आहे. महागाई, रस्ते आणि दर्जेदार शिक्षण हे मुद्दे सध्या महत्वाचे आहेत. पण, विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या समस्या सोडवेल, याची खात्री नाही,” अशी खंत मणियार यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : मतदान यादीतून अनेक नावं गायब…; ‘आप’ करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार!
“जुहापुरा हा भाग अहमदाबादपासून वेगळा करण्यात आला. त्यामुळे मुलभूत पायाभूत सुविधांशिवाय वंचित राहावे लागत आहे. गॅस, रस्ते, ड्रेनेज आणि पाण्याची कमतरता, अशा समस्यांचा सामना करावा लागतो. मुस्लीम समाजाला आर्थिक समृद्धीची गरज आहे. माझ्या शेजारील मुलीला चांगले गुण मिळाले असून, तिला डॉक्टर बनायचं होतं. पण, शिक्षणासाठी पैसे नसल्याने तिला अन्य विभागाकडे वळावे लागले,” असेही मणियार यांनी म्हटलं.
जुहापुरा भागातील दुसरे रहिवाशी आय एच कादरी म्हणाले की, “भाजपा, काँग्रेस आणि आपने जुहापुरा परिसरात प्रचार करणे टाळले आहे. जुहापुरातील अनेक नागरिकांकडे मतदान ओळखपत्र नाही. त्यामुळे येथील लोक मतदानही करत नाही. भाजपाला मुस्लीम मतांची गरज नाही. तर, काँग्रेसने त्यांना गृहीत धरलं आहे. आप हा सॉफ्ट हिंदुत्वावर आधारित असल्याने त्यांनीही भागात प्रचार करणे टाळलं आहे,” असेही आय एच कादरी यांनी सांगितलं.