विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. येथे भाजपाला आपली २७ वर्षांपासूनची सत्ता कायम राखायची आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष भाजपाला नेस्तनाबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. असे असतानाच या निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने उडी घेतल्यामुळे यावेळी राजकीय गणित बदलले आहे. याच कारणामुळे जगदिया मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. आप पक्षामुळे जगदिया या मतदारसंघात पिता-पूत्र समोरासमोर उभे ठाकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय आहे?

हेही वाचा >>> Gujarat Assembly Election : काँग्रेसची साथ सोडलेल्या हार्दिक पटेलला वीरमगावमधून उमेदवारी; भाजपा नेते म्हणतात ‘लढवय्या नेता’

भारतीय ट्रायबल पार्टी अर्थात बीटीपीचे संस्थापक छोटूभाई वसावा आणि त्यांचे पुत्र महेश वसावा एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी (१४ नोव्हेंबर) छोटुभाई यांनी जगदिया या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. छोटुभाई जगदिया या मतदारसंघातून सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर याच मतदारसंघातून महेश वसावा यांनी बीपीटी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. महेश वसावा सध्या देडिपाडा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत.

आप पक्षामुळे पिता-पूत्र संघर्ष

हेही वाचा >>> पोटनिवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्रिपुरात वर्चस्व वाढवण्याचा टीएमसीचा प्रयत्न, भाजपाला टक्कर देण्यासाठी नेते रिंगणात

याच वर्षी मे महिन्यात बीपीटी आणि आप पक्षात युती झाली होती. ही युती जेमतेत तीन महिने राहिली. पुढे बीपीटी पक्षातील चार महत्त्वाच्या नेत्यांनी आप पक्षात प्रवेश केला. यामध्ये चैतार वसावा यांचादेखील समावेश आहे. चौतार हे महेश वसावा यांचे विश्नासू सहकारी मानले जात होते. मात्र चौतार देडिपाडा मतदारसंघातून आपचे उमेदवार आहेत. याच कारणामुळे महेश वासावा यांनी तुलनेने सुरक्षित मतदारसंघाचा शोध म्हणून जगदिया या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

हेही वाचा >>> तीन दशकांपासून भाजपाचा आमदार, गुजरात दंगलीची झळ सोसलेल्या ‘नरोडा’ जागेवर यावेळी कोण जिंकणार?

महेश वसावा यांना जगदिया मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरायचा असल्यामुळे त्यांनी आपले वडील छोटूभाई यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र छोटूभाई यांना आता याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. याच कारणामुळे जगदिया या मतदारसंघात महेश वसावा आणि छोटुभाई वसावा या पितापुत्रांत लढत होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 bharatiya tribal party mahesh vasava against chhotubhai vasava prd
Show comments