गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. येथे १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. असे असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस, भाजपा तसेच आप पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत. सध्या प्रचाराचे तंत्र बदलले आहे. हे बदलते तंत्र भाजपाने आत्मसात केले असून भाजपाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘डिजिटल वॉर रूम’ सुरू केली आहे. भाजपाचे एकूण ५० हजार कार्यकर्ते सोशल मीडियावर प्रचार करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>> Gujarat Election 2022: आधी कुटुंबाशी लढा, आता जातीय समीकरणांचा अडथळा; काय आहेत इसुदान गढवींपुढील आव्हानं?

गुजरातमध्ये सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी भाजपाने एक वॉर रुम तयार केली आहे. या वॉर रुममध्ये डिजिडल मार्केटिंगचं ज्ञान असलेले तसेच सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या प्रचाराची माहिती असेलेल एकूण १०० तरुण-तरुणी आहेत. यामध्ये काही तरुण हे इंटर्न आहेत. या टीमकडून भाजपाची विकासकामे तसेच भाजपाच्या नेत्यांकडून केल्या जाणारे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे. याव्यतिरिक्त भाजपाकडे राज्यात १० हजार सोशल मीडिया आहेत. राज्यभारात भाजपाकडे साधारण ५० हजार स्वयंसेवक आहेत जे सोशल मीडियावर प्रचाराचे काम कत आहेत.

हेही वाचा >>>> पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला झटका, काँग्रेसचे राजकीय डावपेच यशस्वी

भाजपासाठी काम करणाऱ्या या वॉर रूमची एकूण चार भागांत विभागणी करण्यात आलेली आहे. दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, उत्तर गुजरात, मध्य गुजरात असे हे चार विभाग आहेत. या चार विभागांचे आणखी उपविभाग करण्यात आले आहेत. सुरत सारख्या मोठ्या शहरांचेही वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. सुरत शहराचे दोन भाग करण्यात आले आहेत. या दोन विभांसाठी दोन वेगवेगळ्या टीम काम करत आहेत.

हेही वाचा >>>> Gujarat elections 2022 : गुजरातच्या निवडणुकीत नेहरू-पटेल मुद्दा केंद्रस्थानी; भाजपाच्या ‘त्या’ आरोपात कितपत तथ्य?

गुजरात सोशल मीडिया विभागाचे प्रमुख पंकज शुक्ला यांनी भाजपाच्या या वॉर रूमबाबत अधिक माहिती दिली आहे. सोशल मीडियाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामावर आमची नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांचा प्रत्येक संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही शिकावू विद्यार्थ्यांना कामावर ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियाचे ज्ञान असलेले जवळपास ५० हजार कार्यकर्ते आमच्याकडे आहेत, असे पंकज शुक्ला यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 bjp formed war room for social media campaign prd