गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. याच कारणामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपानेही नुकताच आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यामध्ये मोठमोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना वीज, मुलींना मोफत शिक्षण, नोकरी यासारख्या आकर्षक आश्वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. दरम्यान, भाजपाच्या या जाहीरनाम्यावर काँग्रेस आणि आप पक्षाकूडन टीका केली जात आहे. आम्ही दिलेली आश्वासनेच भाजपानेही दिली आहेत असा दावा काँग्रेस, आप पक्षाकडून केला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंवरील विधानावरून राज ठाकरेंचा सत्तारांवर हल्लाबोल, प्रवक्त्यांवरही संतापले, म्हणाले…

भाजपाने आपल्या जाहीरनाम्याला ‘अग्रेसर गुजरात संकल्प पत्र २०२२’ असे नाव दिले आहे. या जाहीरन्यात भाजपाने गुजरातमधील जनतेला वेगवेगळी आश्वासने दिली आहेत. मुलींना बालवाडीपासून ते पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. अशीच घोषणा काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात केलेली आहे. आप पक्षानेदेखील सर्व मुलांना मोफत शिक्षण देणार असल्याचे म्हटलेले आहे. सुरतमधील महिदारपुरा येथे बोलताना आपचे उमेदवार कल्पेश कथिरिया यांनी भाजपाचा जाहीरनामा म्हणजे आप पक्षाच्या जाहीरनाम्याची ‘झेरॉक्स कॉपी’ आहे, अशी टीका केली आहे.

हेही वाचा >>> ideo: “आज मी लिहून देतो…”, म्हणत अरविंद केजरीवालांनी खरंच सहीनिशी लिहून दिलं; म्हणाले, “गुजरातमध्ये…!”

पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या उपचारांची मर्यात ५ लाखांवरून १० लाख रुपये करण्यात येईल, असे आश्वासन भाजपाने दिले आहे. काँग्रेसनेदेखील १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जाईल, असे आपल्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपाने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत दोन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. तर काँग्रेसने गॅस सिलिंडरवर ५०० रुपयांपर्यंत सबसीडी देऊ, असे म्हटले आहे.

भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात वाढती महागाई, शेतकऱ्यांचे कर्ज, सागरी सुरक्षा, आर्थिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे तर आप पक्षाने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा केला जाईल, असेदेखील काँग्रेस आणि आप पक्षाने सांगितले आहे.

हेही वाचा >>> Gujarat Election 2022 : “दिल्लीतील ‘आप’चा ‘नमूना’ दहशतवादाचा…”; योगी आदित्यनाथ यांची केजरीवालांवर जहाल टीका

काँग्रेस आणि आप पक्षाने ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज देऊ असे सांगितले आहे. मात्र भाजपाने असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही. भाजपाने २० लाख नव्या नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. तर काँग्रेस आणि आप पक्षाने १० लाख नव्या नोकऱ्या निर्माण करू असे म्हटले आहे. कंत्राटी सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित नोकरीवर घेतले जाईल, असे आश्वासन काँग्रेसने गुजरातच्या मतदारांना दिलेले आहे. काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याचेही आश्वासन दिलेले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 bjp published manifesto congress and app criticized prd