गुजरातमध्ये १ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याआधी प्रचाराची सांगता होण्याअगोदर काँग्रेस, आप तसेच भाजपाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी गुजरातमध्ये जाहीर सभा घेतल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रावणाशी तुलना केली. तर भाजपाकडूनदेखील काँग्रेसच्या या टीकेला जशास तसे उत्तर देण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेत काँग्रेसची विचारधारा आणि धोरणावर जोरदार टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>>‘भारत जोडो यात्रे’त झळकला राहुल गांधींचा ‘जबरा फॅन’, ११ वर्षांपासून चालतोय अनवाणी पायांनी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सौराष्ट्रात एकूण चार सभांना संबोधित केले. या सभांमध्ये त्यांनी प्रामुख्याने काँग्रेसला लक्ष्य केले. भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथे सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसने नेहमीच फोडाफोडीचे राजकारण केलेले आहे. भाजपा सत्तेत येण्यापूर्व काँग्रेसने गुजरातमध्ये याच नीतीचा अवलंब केलेला आहे, अशी टीका केली. “एकता आणि सौहार्द हा आमचा मंत्र आहे. गुजरातमधील जनतेत एकजूट आहे. याच कारणामुळे गुजरात प्रगतीपथावर आहे. तर दुसरीकडे ‘फोडा आणि राज्य करा’ अशी काँग्रेसची रणनीती राहिलेली आहे,” असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>> गेहलोत यांनी पायलट यांना ‘गद्दार’ म्हटल्यावर जयराम रमेश यांनी ठणकावलं; म्हणाले, “काही शब्दप्रयोग…”

“काँग्रेसने लोकांमध्ये भांडण लावण्याचे काम केले. काँग्रेसने नेहमीच आपले हीत शाबूत राहावे कसे राहील याचा विचार केलेला आहे. गुजरात वेगळे राज्य होण्याअगोदर काँग्रेसने मराठी आणि गुजराती लोकामध्ये भांडण लावून दिले. याच कारणामुळे गुजरात राज्याची निर्मिती झाल्यांतर वेगवेगळ्या प्रांतात, समाजात तेढ निर्माण झाली. मात्र गुजरातच्या लोकांनी एकजुटीचा मार्ग निवडला आणि भाजपाला संधी दिली. मागील २० वर्षांपासून गुजरात प्रगतीच्या मार्गाने जात आहे. याआधी बाजार, मंदिरांमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election 2022 narendra modi said congress use divide and rule formula prd