गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे. अशाच काँग्रेस गुजरातमध्ये प्रचार करण्यात कमी पडत असून आम आदमी पक्ष काँग्रेसपेक्षा जोमाने प्रचार करत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. दरम्यान आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीही गुजरातमध्ये सभा घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाल्यापासून त्यांची ही पहिलीच राजकीय सभा असणार आहे.

हेही वाचा – केरळ काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा शशी थरुरांना फटका; ‘संघ परिवार आणि धर्मनिरपेक्षतेपुढील आव्हाने’ व्याख्यान रद्द

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी

राहुल गांधी २१ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये दोन सभा घेणार आहे. यापैकी पहिली सभा सुरतमध्ये, तर दुसरी सभा राजकोटमध्ये होईल. यापूर्वी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी गुजरातला भेट दिली होती. मात्र, यावेळी त्यांनी कोणतीही राजकीय सभा घेतली नव्हती.

हेही वाचा – Gujarat Elections : हार्दिक पटेलांनी सांगितलं गुजरातमध्ये भाजपाला पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळण्याचं कारण, म्हणाले…

औद्यागिक केंद्र असलेल्या दक्षिण गुजरातच्या सुरतमधील व्यापाऱ्यांमध्ये नोटाबंदी आणि जीएसटी विरोधात नाराजी असतानाही काँग्रेसला २०१७च्या विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे काँग्रेसने यंदा आदिवासी भाग असलेल्या महूवामध्ये राहुल गांधींची सभा आयोजित केली आहे. गेल्या निवडणुकीत एसटी संवर्गासाठी राखीव असेलल्या २७ जागांपैकी १७ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. महत्त्वाचे म्हणजे १७ पैकी १४ जागा या दक्षिण गुजरातमधील होत्या. त्यामुळे काँग्रेसला राहुल गांधींच्या सभेतून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्या या सभेचा फायदा निझर, वलसाड, कापराडा आणि दंग या जागांवरही होईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. महत्त्वाचे भाजपानेही आपल्या प्रचारांची सुरूवात वलसाडमधूनच केली होती. तसेच आपनेही आदिवासीबहूल भागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आदिवासी भागात तीन सभा केल्या आहेत. एकंदरीत आदिवासी मतांवर तिन्ही पक्षांचा डोळा आहे.

हेही वाचा – Gujarat Election 2022: बंडखोरांना भाजपाचा दणका, अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या सात जणांचे पक्षातून निलंबन

सुरतनंतर राहुल गांधी भाजपाच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच राजकोटमध्ये सभा घेणार आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा या जागेवर पराभव झाला होता. मात्र, संपूर्ण सौराष्ट्रात काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी काँग्रेसने २८ जागा जिंकल्या होत्या. राजकोट हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनीही विधानसभेची पहिली निवडणूक राजकोट पश्चिममधून लढवली होती. तसेच विजय रुपाणी यांनीही २०१४ मध्ये राजकोट पश्चिमच्या जागेवरून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

Story img Loader