गुजरातमध्ये विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्पात मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. दिल्ली आणि पंजबामधील विजयानंतर आपनेही गुजरातमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, या निवडणुकीत सर्वाचे लक्ष बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम विधानसभा मतदारसंघावर आहे. याठिकाणी विद्यमान अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. एआयएमआएमनेही या ठिकाणी उमेवार दिला असला तरी खरी लढत भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Gujarat Election: “आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, मुख्य लढत भाजपा-काँग्रेसमध्ये होणार” अमित शाहांचं मोठं विधान

वडगाम विधानसभा मतदारसंघात जिग्नेश मेवानी यांच्याविरोधात भाजपाने मनिलाल वाघेला यांना उमेदवारी दिली आहे. वाघेला हे २०१२ ते २०१७ दरम्यान काँग्रेस आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१७ मध्ये काँग्रेसने त्यांना शेजारी असलेल्या इडर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांचा भाजपा उमेदवार हिटू कनोडिया यांनी पराभव केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या वाघेला यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर आपकडून दलपट भाटिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वडगाम मतदारसंघ हा मागासवर्गीय उमेदवारासाठी राखीव असला, तरी या मतदारसंघात मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच दलित, ठाकोर, चौधरी आणि दरबार समाजाची मतंही मोठ्या प्रमाणात आहे. हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. दरम्यान, या निवडणुकीत दलित मतांचे विभाजन हा एक महत्त्वाचा घटक असेल. विशेषत: वनकर आणि रोहित समजाची मतं नेमकी कोणाच्या पारड्यात पडतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : गुजरातमध्ये ‘या’ मतदारसंघात होणार पिता-पुत्रामध्ये लढत, आप पक्षामुळे गणित बिघडले

दरम्यान, चौधरी समाजाचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री विपुल चौधरी यांना कथीत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यावरून चौधरी समाजाकडून भाजपा विरोधात निदर्शने करण्यात येत आहे. त्यामुळे चौधरी समाजाची मतं भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. वडगाममध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर आहे. मेवानी यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. एकंदरीतच वडगाम मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे.