सहा राज्यांमधील सात विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल काल(रविवार) जाहीर झाले. बिहारमध्ये विरोधकांच्या एकजुटीनंतरही भाजपा गोपालगंजची जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. या जागेवरील विजय आणि पराभवाचे अंतर हे दोन हजारांपेक्षाही कमी मतांचे होते. तर तिसऱ्या क्रमांकावर ओवसींच्या एमआयएमचा उमेदवार होता. ज्याला १२ हजार मत मिळाले होते. हेच गुजरातमध्ये निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षाच्या चिंतेचे कारण बनले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “आम्ही अल्टिमेटमला घाबरत नाही; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान!

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. 

हेही वाचा -“२४ तासांच्या आत नाक घासून सुप्रिया सुळेंची माफी मागा, अन्यथा…”; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्टिमेटम!

ओवेसींनी गुजरात निवडणुकीच्या रिंगणातही उडी घेतली आहे. गुजरातमधील प्रमुख राजकीय पक्षांची चिंता ही आहे की, एमआयएम निवडणूक भलेही जिंकणार नाही, परंतु त्यांचं गणित नक्कीच बिघडवू शकते. जाणून घेऊयात एमआयएमची निवडणुकीसाठी काय रणनिती आहे? एमआयएममुळे कोणत्या पक्षाला किती नुकसान होऊ शकतं?

गुजरात निवडणुकीसाठी AIMIM ची रणनिती काय? –

या संदर्भात अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी यंदा गुजरातच्या ३० विधासभा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये कच्छ जिल्ह्यातील अबडासा, मांडवी, भूज, अंजार, गांधीधाम आणि बनासकांठाची वडगाम, पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर जागेबरोबर अहमदाबादमधील मुस्लीम बहुल असणाऱ्या पाच जागांचा समावेश आहे. यामध्ये वेजलपुर, दरियापुर, जमालपुर, दानीलिमडा याही जागा आहेत. याशिवाय एमआयएमच्या यादीत देवभूमी द्वारकाची खेडब्रह्मासह जूनागढ, पंचमहाल, गीर सोमनाथ, भरूच, सुरत, अरवल्ली, जामनगर, आणंद आणि सुरेंद्र नगरच्या काही जागांचाही समावेश आहे. ओवेसींना हे माहीत आहे की ३० जागांवर निवडणूक लढवून ते गुजरातमध्ये सरकार बनवू शकत नाही. मात्र याद्वारे ते मुस्लीम मतदारांना एकत्र नक्कीच करू शकतात. त्यामुळेच त्यांनी अशा ३० जागा निवडल्या आहेत की जिथे ३० ते ६० टक्के मुस्लीम मतदार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी? –

राजकीय अभ्यासकांच्या मते गुजरात विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ओवेसी लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी करत आहेत. विधानसभा निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात उतरवून ते हे पाहत आहेत की, लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा किती फायदा होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीसाठी किती उमेदवार उभा करता येतील. गुजरातमध्ये २६ लोकसभा मतदारसंघ असून सर्व जागांवर भाजपाचा ताबा आहे.

अन्य पक्षांना किती होऊ शकते नुकसान? –

गुजरातमध्ये मुस्लीम लोकसंख्या १० टक्के आहे. ३० पेक्षा जास्त जागांवर मुस्लीम मतदारांची संख्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याच जागांवर एमआयएमचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एमआयएमचे अध्यक्ष ओवेसींच्या चाहत्या वर्गात मुस्लीम समाजातील तरुणांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एमआयएमच्या उमेदवारांना बऱ्याच प्रमाणात मुस्लीम मतं मिळण्याची शक्यता आहे. मुस्लीम मतांचे विभाजन जर होत असेल तर याचा फायादा नक्कीच भाजपाला होऊ शकतो. ओवेसी हे विभाजन करण्यात यशस्वी होतीलच असं नाही, याची उदाहरणं अगोदरही बघायला मिळाली आहेत. जसं की ओवेसींना बिहारमध्ये यश मिळालं, तेच पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेश सारख्या राज्यात ते अयशस्वीही ठरले आहेत. खरंत उत्तर प्रदेशमध्ये १९ टक्क्यांपेक्षा जास्त आणि पश्चिम बंगालमध्ये २७ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.

गुजरातमध्ये एमआयएमची काय परिस्थिती? –

फेब्रुवारी २०२१ मध्ये गुजरात महानगरपालिका निवडणूक झाली होती. तेव्हा एमआयएमनेही आपले अनेक उमेदवार मैदानात उतरवले होते. तेव्हा २६ वॉर्डांमध्ये एमआयएमचे उमेदवार विजयी झाले होते. अहमदाबादमध्ये सात जागा, गोध्रा- सहा, मोडासा – नऊ आणि भरूच येथील एका जागेचा यामध्ये समावेश होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat election will mim spoil the calculation of other political parties in gujarat too msr
Show comments