गुजरात विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, रविवारी आम आदमी पक्षाने त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इशूदान गढवी हे द्वारका जिल्ह्यातील खांभालिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. या मतदारसंघात अहिर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. १९७२ पासून या मतदारसंघात अहिर समाजाचे आमदार निवडून आले आहेत.
इशूदान गढवी यांची लढत मुख्यत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार विक्रम मदम आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुलू बेरा यांच्याशी असणार आहे. गेल्या तीन दशकांपासून मदम आणि बेरा हे एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आहेत. तसेच २० वर्षांनंतर दोघे एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, १९७२ मध्ये अहिर समाजाचे नेते हेमंत मदम यांनी अपक्ष निडणूक लढवत नकूम यांचा परावभ केला होता. त्यानंतर मदम यांनी १७७५, १९८० आणि १९८५ मध्येही अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. मात्र, १९९० मध्ये हेमंत मदम यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर याठिकाणी काँग्रेसला विजय मिळवता आला. १९९३ मध्ये हेमंत मदम यांच्या निधनानंतर १९९५ मध्ये भाजपाने या मतदारसंघात पहिल्यादा विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८, २०००, २००७ आणि २०१२ अशी दोन दशके भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, प्रत्येकवेळी भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार अहिर समाजाचे होते. २०१२ मध्ये हेमंत मदम यांची मुलगी पुनम मदम यांनी विधानसभा निवडणूक जिंकत पुन्हा या मतदारसंघात मदम गटाचे वर्चस्व कायम केले. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मेरामन गोरिया आणि २०१७ च्या विधानसभा निडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विक्रम मदम यांनी विजय मिळला होता.
हेही वाचा – EWS Quota Verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे का आहे काँग्रेस गोंधळात?
काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या म्हणण्यानुसार या मतदारसंघात अहिर मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, काँग्रेस आमदार विक्रम मदम हे या विचाराशी समहमत आहेत. खांबालिया निडवणुकीतील यश हे केवळ अहिर मतदारांवर अवलंबून नसून येथे दोन लाखांपेक्षा जास्त मते इतर समाजाची आहेत. याठिकाणी ५७ टक्के मतं ही अहिर समाजाची असली तरी मला २०१७ मध्ये एकूण ८० हजार मतं मिळाली होती. सर्व समाजातील मतदारांनी मला मतदान केले होते. त्याचा हा पुरावा आहे, अशी प्रतिक्रिया विक्रम मदम यांनी दिली.