Gujarat Assembly Election 2022 : भारतीय जनता पार्टीचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे की, केंद्राकडून सध्याच्या कोट्याला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास(ईडब्ल्यूएस) वर्गासााठी दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे गुजरातमध्ये पटेल समाजाचे अनेक मुद्दे निकाली निघाले आहेत आणि समुदाय आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित करेल.

हेही वाचा – Gujarat Assembly Election : काँग्रेसची साथ सोडलेल्या हार्दिक पटेलला वीरमगावमधून उमेदवारी; भाजपा नेते म्हणतात ‘लढवय्या नेता’

Uddhav Thackeray Aditya Thackeray (1)
Maharashtra Elections : “वरळी-वांद्र्यात मदत मिळावी यासाठी भिवंडीवर अन्याय”, माजी आमदाराची उद्धव ठाकरेंवर टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
bjp vs ncp sharad pawar
सोलापुरात बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चुरस
dhangar candidates vidhan sabha
धनगर समाजाच्या पदरी निराशा
Ajit Pawar met rebel Nana Kate, Ajit Pawar latest news,
बंडखोर नाना काटेंची अजित पवारांनी घेतली भेट; महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू
mahrashtra vidhan sabha
दिवाळीनंतर भाजपचा प्रचारसभांचा धुरळा
girish karale candidate of ncp sharad pawar
मोर्शीचा तिढा सुटला; काँग्रेसचे गिरीश कराळे राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार
marathwada assembly elections
‘कमळा’ची लढत ‘मशाल’ टाळून, मराठवाड्यात भाजपला ठाकरे गटाचे आव्हान कमी; दोनच जागांचा अपवाद

गुजरातमध्ये २०१५ च्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व केलेले हार्दिक पटेल यांनी म्हटले की, आंदोलनाने २०१७ च्या गुजरात निवडणुकीत जवळपास २० विधानसभा मतदारसंघांवर परिणाम केला होता. त्यांनी २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

केंद्राने जानेवारी २०१९ मध्ये घटना दुरुस्ती केली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) सर्वसाधारण वर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू केले होते. ज्याने अनुसूचित जाती(एससी), अनुसूचित जमाती(एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गांच्या आनुपातिक जागांवर प्रतिकुल प्रभाव न टाकता ईडब्ल्यूएस आरक्षण प्रदान करण्यासाठी शिक्षण संस्थात जागांची एकूण संख्या वाढवण्याचे निर्देशही दिले. या महिन्याच्या सुरुवातीस सर्वोच्च न्यायालयाने ३:२ च्या बहुमताच्या निकालात नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रवेश आणि प्रवेश कायम ठेवला. ज्यामध्ये एससी, एसट आणि ओबीसी वर्गातील गरिबांना वगळले होते.

पटेल समज भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करणार –

हार्दिक पटेलने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पाटीदार समजात एकजुट आहे आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ च्या निवडणुकीत वेगळा मुद्दा होता. १० टक्के EWS कोट्यामुळे गुजरातमधील पटेलांसह अन्य वर्गातील गरीब आणि वंचितांसाठी आरक्षणाचा लाभ वाढवला आहे. त्यामुळे यंदा पटेल प्रचंड बहुमताने भाजपाला निश्चित विजय करतील. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि EWS बाबत घेतलेल्या निर्णयाला ऐतिहासिक म्हटले. या निर्णयामुळे ५० पेक्षा जास्त समजांमधील गरिबांना फायदा होईल, असंही ते म्हणाले.

२०१५-१६ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा राहिलेले भाजपा नेते हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाव मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वीरमगावला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन देत हार्दिक पटेल यांनी या वचननामा जाहीर केला आहे. तर भाजपा नेत्यांकडून हार्दिक पटेल यांची प्रशंसा केली जात असून, एक लढवय्या नेता असं त्यांना संबोधलं जात आहे.