गुजरातमध्ये २०१५-१६ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा राहिलेले हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाव मतदार संघातून भाजपाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वीरमगावला जिल्ह्याचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन देत हार्दिक पटेल यांनी या वचननामा जाहीर केला आहे. तर भाजपा नेत्यांकडून हार्दिक पटेल यांची प्रशंसा केली जात असून, एक लढवय्या नेता असं त्यांना संबोधलं जात आहे. मात्र हार्दिक पटेल यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. कारण, हार्दिक पटेलांवार गुजरातमधील पाटीदार समाज नाराज असल्याचे समोर येत आहे.
गुजरातमध्ये २०१५ च्या पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व केलेले हार्दिक पटेल यांनी म्हटले की, आंदोलनाने २०१७ च्या गुजरात निवडणुकीत जवळपास २० विधानसभा मतदारसंघांवर परिणाम केला होता. त्यांनी २०१७ मधील निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
हार्दिक पटेल यांनी पाटीदार अनामत संघर्ष समिती (PAS) च्या बॅनरखाली आंदोलन केले होते आणि गुजरातमध्ये पाटीदारांना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. एवढच नाहीतर त्यांनी भाजपा सरकारवर हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचाही आरोप केला होता. आपले आंदोलन सुरू ठेवतच त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र यावर्षीच्या सुरुवातीस त्यांनी भाजपात प्रवेश केला. खरंतर अनेक मुद्द्य्यांवर हार्दिक पटेल हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील टीकाकार म्हणून ओळखले जात होते.
हेही वाचा – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’; सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विधान!
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आपला २३ वर्षीय मुलगा नीसीज पटेल यास गमवणारे प्रवीणभाई पटेल आणि त्यांची पत्नी हार्दिक पटेल यांच्या या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी सांगितले की, माझा मुलगा दूध घेण्यासाठी बाहेर गेला होता आणि पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. आंदोलनाशी त्याचा कोणताही संबंध नव्हता. पोलिसांनी गोळीबार करण्याचं टोकाचं उचललं होतं. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर हार्दिक पटेल कधीच आम्हाला भेटायला आले नाहीत.
याशिवाय पाटीदार समाजाच्या अन्य काही लोकांनीही हार्दिक पटेल यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांची फसवणुक झाल्याची त्यांच्यात भावना आहे. २०१५ च्या पाटीदार आंदोलनात १४ जणांचा मृत्यू झाला होता. पाटीदार समाजातील काही जणांचे म्हणणे आहे की हार्दिक पटेल यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर केला होता.
पाटीदार समाजातील अन्य काही लोकांनी हेही सांगितले की, हार्दिक पटेल यांच्यासह पाटीदार आंदोलनातील नेत्यांनी शपथ घेतली होती की ते निवडणुकीच्या राजकारणात सहभागी होणार नाहीत. मात्र केवळ हार्दिक पटेल यांनीच आपला शब्द पाळलेला नाही. लालजीभाई यांनी सांगितले की, आम्ही ठरवले होते की आम्ही निवडणुकीच्या राजकारणात जाणार नाहीत. हार्दिक पटेल यांनी