Vadodara Politics : गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं वडोदरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांना समस्या आणि संकटांचा सामना करावा लागत आहे. या मुसळधारेमुळे गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास ३५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा आढावा घेत, मदतकार्याबाबत भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. मात्र, असं असलं तरी वडोदरामधील विविध प्रश्नांमुळे सत्ताधारी भाजपाला आता लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

वडोदरामधील पूरग्रस्त भागातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दोन ते तीन दिवसांपासून वडोदरातील काही भागांत पाणी शिरलेलं आहे. या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक लोकांच्या घरांत पाणी शिरलं आहे आणि अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. एवढंच नाही, तर लोकांची वाहनं आणि मौल्यवान वस्तूंचंही नुकसान झालं. त्यामुळे येथील लोक आता स्थानिक नेत्यांविरोधात आंदोलन करीत असून, स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधातही रोष व्यक्त करीत आहेत.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

हेही वाचा : RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत

एवढंच नाही, तर येथील रहिवाशांनी नेत्यांवर हल्ले केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. वडोदरातील अनेक भागांत मदतीसाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा पाठविल्याच्या घटना आणि मारहाण केल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वडोदरा शहर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मनीषा वकील यांना एका भेटीदरम्यान त्यांना त्या भागातून पुन्हा परत जाण्यास सांगण्यात येत असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. अशीच परिस्थिती गुजरात विधानसभेतील भाजपाचे नेते बाळकृष्ण शुक्ला आणि पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही आहे. त्याबरोबरच भाजपाचे नगरसेवक बंदिश शहा यांना सलाटवाडा भागात मारहाण करण्यात आली. ते पूरग्रस्त भागात मदत करीत असताना, पाण्याच्या बाटल्या आणि ग्लुकोज, बिस्किटांची पॅकेट्स हिसकावून घेण्याचं सांगितलं गेलं.

खरं तर वडोदरा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. ही जागा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं तत्कालीन खासदार रंजनबेन भट्ट यांच्या उमेदवारीवरूनही भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. तसेच भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ज्योती पंड्या यांनी भट्ट यांची पुनरावृत्ती केल्याबद्दल पक्षावर टीका केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, भाजपानं निवडणुकीत रंजनबेन भट्ट यांच्या जागी हेमांग जोशी यांना उमेदवारी दिली आणि ते तेथून विजयीदेखील झाले.

दरम्यान, सध्या वडोदरामधील पूरग्रस्त परिस्थितीमुळे लोकांचा रोष वाढल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. वडोदरा महानगरपालिकेची निवडणूक २०२६ मध्ये होणार आहे आणि लोकांच्या वाढत्या रोषाचा फटका भाजपाला निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी १,२०० कोटी रुपयांच्या विश्वामित्री नदी पुनरुत्थान प्रकल्पाची घोषणा केली. मात्र, ही घोषणाही स्थानिकांमध्ये उत्साह निर्माण करू शकली नाही. याचं कारण म्हणजे याआधी घोषित केलेले दोन समान प्रकल्प कधीही सुरू झाले नाहीत. आता वडोदरामधून वाहणारी नदी स्वच्छ करून, तिची क्षमता वाढविण्यासाठी विश्वामित्री नदी प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. मात्र, या विश्वामित्री नदी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सातत्यानं होणारा विलंब पक्षासाठी अडचणीचाही ठरू शकतो, असं स्थानिक भाजपा नेत्याचं म्हणणं आहे.

हेही वाचा : हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय

वडोदरामधील भाजपाचे एक ज्येष्ठ नेते ज्यांना त्यांच्या मतदारसंघातही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. ते म्हणाले, “२०१० पासून अधिकृतपणे प्रस्तावित असलेला विश्वामित्री प्रकल्प सुरू झालेला नाही आणि परिस्थिती दरवर्षी बिघडत चालली आहे. हे लोकांना माहीत आहे. या प्रकल्पाची सध्याची घोषणा अनिर्णीत राहिल्यास आगामी काळात भाजपाला निश्चितच अडचणींचा सामना करावा लागेल. कारण- प्रत्येक पावसाळ्यात लोकांना अशा प्रकारच्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. तसेच येथील पक्षाच्या शहर कार्यकारिणीमध्ये गटबाजी असून, समन्वयाचा अभाव असल्याचंही लोकांना माहीत आहे.”

भाजपाचे शहराध्यक्ष विजय शहा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “सोमवारच्या मुसळधार पावसानंतर पहिले ४८ तास पाण्याची पातळी वाढत होती. मात्र, तरीही अडकलेल्या रहिवाशांपर्यंत कोणतीही मदत पोहोचू शकली नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. हे खरं आहे की, या वेळच्या पुराची व्याप्ती मागील वर्षांपेक्षा जास्त होती. यापूर्वी वसाहतींमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात मदत केली. तसेच भाजपानं तळागाळातील नाराजीवर लक्ष केंद्रित केलं आहे. जेव्हा नुकसान होतं तेव्हा लोकांना त्यांचा राग व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आम्हालाही माहीत आहे की, लोकांचं नुकसान झालं आहे. ते त्यांच्या गाड्या वा इतर वाहनंही वाचवू शकले नाहीत. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे परिपक्व लोक आहेत. ज्यांना लोकांचं दुःख माहीत आहे. ते परिस्थिती व्यवस्थित हाताळतील.”

दरम्यान, वीज, पिण्याचे पाणी व अन्न यांचा अभाव असल्यानं रहिवासी अडकून पडलेल्या भागांतही संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. जेव्हा विश्वामित्री नदीनं आपली कमाल पातळी ३५.२५ फूट ओलांडली होती आणि अंदाजानुसार, शहराच्या बहुतांश भागात ती ४० फुटांवरून वाहत होती. त्यादरम्यानच्या पहिल्या ४८ तासांत त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पाठवली गेली नाही. दरम्यान, राज्यात ३० वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या भाजपाप्रति वडोदरावासीयांच्या नाराजीनं कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवरही लोकांचा रोष

वडोदरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक लोकांना समस्या आणि संकटांचा सामना करावा लागत आहे. पूरसदृश परिस्थितीच्या समस्यांमुळे भाजपासह काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवरही लोकांचा रोष असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुराच्या वेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अशोक ओझा यांच्यासह अजून काही नेत्यांनी गुरुवारी पक्षाचे उपरणे घालून पूरग्रस्त भागाला भेट दिली. तेव्हा त्यांनाही लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. काँग्रेस नेते अमी रावत यांनाही त्यांच्या प्रभागातील पूरग्रस्त भागाच्या भेटीदरम्यान विरोधाचा सामना करावा लागला.