गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी यांच्या उपस्थितीत महेंद्रसिंह वाघेला यांनी पक्षप्रवेश केला. आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाची इच्छा असेल तर निवडणूक लढवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१२ ते २०१७ या काळात उत्तर गुजरातमधील बयाद मतदारसंघातून महेंद्रसिंह वाघेला हे काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. यानंतर आता गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघेला यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. “मी निवडणूक लढवावी की नाही? याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल. मी कोणतीही अपेक्षा न ठेवता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच राजीनामा दिला होता. कारण सुरुवातीपासून माझ्या मनात ‘काँग्रेस’ होता, त्यामुळे मी भाजपाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.

हेही वाचा- भारत जोडो यात्रींसाठी मराठवाडी-खान्देशी भोजन

ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यसभा निवडणुकीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह यांच्यासह १४ आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केले होते. यामध्ये महेंद्र सिंह यांचाही समावेश होता. संबंधित आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. पुढे जुलै २०१८ मध्ये त्यांनी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश केला. पण तीन महिन्यातच त्यांनी भाजपातून राजीनामा दिला. या घटनाक्रमानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये ‘घर वापसी’ केली आहे.

हेही वाचा- Video: “भारत जोडो यात्रेत अचानक आली शाळकरी मुलं, मग राहुल गांधींनी…”, तेलंगणातील यात्रेदरम्यानचं हृदयस्पर्शी दृश्य

महेंद्र सिंह वाघेला यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन हाय कमांडने गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनाही परतण्याचे संकेत दिले आहेत. मुलाचं काँग्रेसमधील पुनरागमन म्हणजे शंकरसिंह यांची पक्षात “बॅकडोअर एंट्री” असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. महेंद्र सिंह यांच्या उमेदवारीसाठी त्यांचा पूर्वीचा बयाद मतदारसंघ विचारात घेतला जाऊ शकतो. इतर पर्यायांमध्ये देहगाम, अब्दासा किंवा अगदी गांधीनगर मतदारसंघातूनही त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarats ex cm shankarsinh vaghelas son mahendrasinh rejoin congress ahead of gujarat assembly election rmm
Show comments