जळगाव – विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीतून (शरद पवार) अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत होते. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश बारगळला. नवीन वर्षातही त्यांच्या पक्ष प्रवेशाविषयीच्या चर्चेवर अजित पवार गटात निरुत्साह आहे. यामुळेच देवकर यांची पाऊले आता भाजपकडे वळली आहेत.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात पराभव झाल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटाची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेण्याचे नियोजनही केले होते. तत्पूर्वी अजित पवार गटाच्या जळगाव जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवकर यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवून थेट पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर लगेचच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. त्यामुळे देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश बारगळल्यात जमा झाला. त्याविषयी विचारणा केल्यावर अजित पवार गटातील प्रवेशाचा विषय नवीन वर्षात मार्गी लागण्याची शक्यता स्वतः देवकर यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार नवीन वर्षातही अजित पवार गटाकडून त्यांच्या प्रवेशाच्या बाबतीत कोणतीच सकारात्मकता दिसून आलेली नाही. त्यामुळे देवकर आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे.

Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bjp strategy to capture konkan through allocation of ministerial posts
मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Mamata Banerjee Abhishek Banerjee cold war
TMC : तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ चर्चेत
thackeray group in Ahmednagar facing tough situation
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा – मंत्रीपदांच्या वाटणीतून कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच

u

u

u

देवकर यांना अजित पवार गटाकडून पक्षप्रवेश देण्यात कालापव्यय होत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्यासारखा प्रभावी नेता आपल्या पक्षात आल्यास जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विचार भाजपचे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी करू लागले आहेत. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून काही जणांनी देवकर यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चाही रंगली. दोन दिवसांपूर्वी जळगावमध्ये दिशा समितीच्या बैठकीला उपस्थित केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनाही देवकर यांच्या भाजपमधील प्रवेशाविषयी माध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा देवकर यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय आमचे नेते गिरीश महाजन हेच घेतील, असे सूचक वक्तव्य दोन्ही मंत्र्यांनी केले होते.

हेही वाचा – अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील प्रवेशासंदर्भात अद्याप पक्षाध्यक्ष अजित पवार यांची भेट झालेली नाही. दोन-तीन दिवसांत भेट झाल्यावर त्याबाबतीत निर्णय होईल. भाजपकडूनही प्रस्ताव आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी त्यांच्या पक्षात येण्याचा आग्रह करत आहेत. – गुलाबराव देवकर (माजी मंत्री, राष्ट्रवादी-शरद पवार)

Story img Loader